NCP : 32 विरुद्ध 18; आता ‘हे’ 3 आमदार ठरविणार अजित पवारांचं भवितव्य

NCP : 32 विरुद्ध 18; आता ‘हे’ 3 आमदार ठरविणार अजित पवारांचं भवितव्य

मुंबई : राष्ट्रवादीतील अजित पवार यांच्या बंडाचं भवितव्य आता 3 आमदारांच्या हाती आहे. आतापर्यंत 53 पैकी 50 आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यात 50 पैकी अजित पवार यांच्या गोटात त्यांच्यासह 32 आमदार आहेत. तर शरद पवार यांच्या बाजूने 18 आमदार आहेत. मात्र तीन जणांची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात आहे. यात तुरुंगात असलेले अणुशक्तीनगरचे आमदार नवाब मलिक, नाशिकच्या देवळालीच्या आमदार सरोज अहिरे आणि अहमदनगरमधील कोपरगांवचे आमदार आशुतोष काळे यांचा समावेश आहे. हेच तिघे जण अजित पवार यांच्या बंडाचे भवितव्य ठरविणार असल्याचे चित्र आहे. (50 NCP MLA Clears his stand between Ajit Pawar and Sharad Pawar)

अजित पवारांना 35 आमदारांची गरज

बंड यशस्वी करण्यासाठी नियमानुसार अजित पवार यांना दोन तृतीयांश आमदारांची गरज आहे. मात्र अजित पवार यांच्याकडे सध्या 32 आमदार आहेत. 53 पैकी दोन तृतीयांश म्हणजे किमान 35 आमदार सोबत असणं आवश्यक आहे. आता तीनपैकी सरोज अहिरे आणि आशुतोष काळे हे दोघेही दोन्ही बाजूंच्या बैठकांना अनुपस्थित होते.  मात्र अहिरे यांनी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करुन भूमिका स्पष्ट करु असं सांगितलं आहे. तर आशुतोष काळे यांची भूमिका अद्याप समजू शकलेली नाही.

शरद पवार यांच्याकडे एक तृतीयांश आमदार :

दरम्यान, शरद पवार यांच्याकडे आता एक तृतीयांश आमदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशोक पवार, किरण लहामटे अशा बहुतांश आमदारांनी आजच अजित पवार यांची साथ सोडून शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सकाळी केवळ 11 आमदारांचे पाठबळ असलेल्या शरद पवार यांच्या बाजूने दिवस संपेपर्यंत 18 आमदारांचे पाठबळ जमा झाले.

अजित पवारांसोबत असलेले आमदार – विधानसभा

1. छगन भुजबळ
2. दिलीप वळसे पाटील
3. हसन मुश्रीफ
4. धनंजय मुंडे
5. आदिती तटकरे
6. संजय बनसोडे
7. अनिल पाटील
8. धर्मरावबाबा आत्राम
9. बाळासाहेब आजबे
10. निलेश लंके
11. दिलीप बनकर
12. माणिकराव कोकाटे
13. अतुल बेनके
14. सुनिल टिंगरे
15. इंद्रनील नाईक
16. अण्णा बनसोडे
17. बबनदादा शिंदे
18. यशवंत माने
29. नरहरी झिरवळ
20. दत्ता भरणे
21. शेखर निकम
22. दीपक चव्हाण
23. राजेंद्र कारेमोरे
24. नितीन पवार
25. मनोहर चंद्रिकापुरे
26. संग्राम जगताप
27. राजेश पाटील
28. सुनील शेळके
29. दिलीप मोहिते
30. बाबासाहेब पाटील
31. प्रकाश सोळंखे

अजित पवारांसोबत असलेले आमदार – विधानपरिषद

1. रामराजे निंबाळकर
2. अमोल मिटकरी
3. शशिकांत शिंदे
4. सतिश चव्हाण
5. विक्रम काळे

अजित पवारांसोबत असलेले खासदार – लोकसभा

1. सुनिल तटकरे

अजित पवारांसोबत असलेले खासदार – राज्यसभा

1. प्रफुल्ल पटेल (राज्यसभा)

————————————————————————————————————–

शरद पवारांसोबत असलेले आमदार – विधानसभा

1. जयंत पाटील
2. जितेंद्र आव्हाड
3. रोहित पवार
4. राजेश टोपे
5. प्राजक्त तनपुरे-
6. अनिल देशमुख
7. सुनिल भुसारा
8. सुमनताई पाटील
9. संदीप क्षीरसागर
10. बाळासाहेब पाटील
11. चेतन तुपे
12. मानसिंगराव नाईक
13. राजेंद्र शिंगणे
14. डॉ. किरण लहामटे
15. अशोक पवार
16. मकरंद पाटील
17. दौलत दरोडा
18. चंद्रकांत नवघरे

शरद पवारांसोबत असलेले आमदार-विधानपरिषद

1. अरुण अण्णा लाड
2. एकनाथ खडसे
3. शशिकांत शिंदे
4. बाबाजानी दुर्राणी

शरद पवारांसोबत असलेले खासदार – लोकसभा

1. सुप्रिया सुळे
2. श्रीनिवास पाटील
3. अमोल कोल्हे

शरद पवारांसोबत असलेले खासदार – राज्यसभा

1. शरद पवार
2. वंदना चव्हाण
3. फौजिया खान

—————————————————————————————————————-

या तीन आमदारांची भूमिका अद्याप अस्पष्ट :

1. नवाब मलिक
2. आशुतोष काळे
3. सरोज आहिरे

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube