Ajit Pawar : राज्यात महायुतीचं सरकार आहे. आधीच्या डबल इंजिन सरकारला मागच्या वर्षी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा तिसरं इंजिन जोडलं गेलं. या घटनेला एक वर्ष उलटलं आहे. तरी देखील अजित पवार महायुतीत सहभागी झाले तरी कसे, देवेंद्र फडणवीसांबरोबरील पहाटेचा शपथविधी फसला तसा हा हा प्लॅन का फसला नाही असे प्रश्न आजही लोकांच्या मनात आहेत. आता खुद्द अजित पवार यांनीच (Ajit Pawar) महायुतीत सहभागी होण्याचा एक खास किस्सा दिल्लीतील पत्रकारांना सांगितला.
राष्ट्रवादीत फूट पडली. त्यानंतर अजित पवारांचा गट महायुती सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी पडद्यामागे अनेक घडामोडी घडल्या. दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर अनेक बैठका होत होत्या. यासाठी एक खास मोहिम राबवण्यात आली होती अशी चर्चा त्यावेळी होती. या काळात काय घडामोडी घडल्या याची माहिती अजित पवार यांनीच दिली आहे.
शरद पवार-अजित पवार एकत्र येतील; पण काही महत्वाकांक्षी नेत्यांना..सुनिल शेळकेंचा रोख कुणाकडं?
राजधानी दिल्लीत अजित पवार यांनी पत्रकारांशी गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी ऑपरेशन कमळची स्टोरीच पत्रकारांना सांगून टाकली. राज्यातील सत्तेत सहभागी होण्यासाठी दिल्लीत जवळपास दहा बैठका झाल्या. अमित शाह यांच्या घरी सुद्धा काही बैठका झाल्या होत्या. त्यांच्या घरी होणाऱ्या बैठकांना मी मास्क आणि टोपी घालून उपस्थित राहत होतो, असे अजित पवार म्हणाले.
इतकंच नाही तर विमानाचं तिकीट सु्द्धा अजित अनंतराव पवार याऐवजी ए. ए. पवार या नावाने काढलं जायचं. पक्षातील सर्व सहकारी आमदार यांच्याबरोबरच चर्चा करून त्यांची मतं लक्षात घेऊनच हा निर्णय घेतला होता. राजधानी दिल्लीत खासदार सुनील तटकरे यांचं घर आहे. त्यांच्या या निवासस्थानी पहिल्यांदा गप्पा रंगल्या होत्या. भाजपसोबत सत्तेत जाण्याचं सर्वच आमदारांचं म्हणणं होतं. काही आमदार आमच्यासोबत आले पण काही आमदार आले नाहीत.
माजी आमदाराने सोडली अजितदादांची साथ; दुर्रानी आजच करणार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
आगामी विधानसभा निवडणूक महायुती एकत्रितच लढणार आहे. जागावाटपाचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. आता प्रत्येक मतदारसंघाबाबत चर्चा होऊन निर्णय घेण्यात येईल. लोकसभा निवडणुकीतील अपयशापासून धडा घेत आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती एकत्रितपणे लढणार आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.