Maharashtra Politics : 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Result 2024) जाहीर होताच आता राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आता सत्ताधारी महायुतीमध्येच (Mahayuti) आरोप- प्रत्यारोप सुरु झाले आहे.
48 पैकी 45 जागा जिकंण्याचा दावा करणाऱ्या महायुतीला अवघ्या 17 जागांवर समाधान मानावे लागले. भाजपला 9, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 7 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस फक्त 1 जागा मिळाली आहे. यानंतर आज उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस (Devend Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेत आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी सरकारमधून मला मुक्त करावे अशी विनंती भाजप नेतृत्वाकडे केली आहे. यानंतर आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी फडणवीस यांच्या या वक्त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने राजकीय पंडित अनेक दावे करत आहे. यातच शिंदे सरकारमधील मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी देखील पराभवाचे कारणे सांगत आम्हाला ओव्हर कॉन्फिडन्सचा फटका बसला आणि सर्व्हे, जागा वाटपात दिरंगाई झालाी त्याचाही फटका बसल्याचे त्यांनी सांगितले.
तर काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) देखील महायुतीवर नाराज झाल्याची बातमी समोर आली होती यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत होती. यातच आज देवेंद्र फडणवीस यांनी पक्षश्रेष्टीकडे मोठी मागणी करत सरकारमधून मला मुक्त करावे अशी विनंती केल्याने लवकरच राज्यात राजकीय भूकंप येणार असल्याची शक्यता अनेकांकडून वर्तवण्यात येत आहे.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस
पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस म्हणाले, पुन्हा एकदा देशातील जनतेने एनडीएला पूर्ण बहुमत दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार आहे. इंडिया आघाडीने जितके जागा जिंकले आहे त्यापेक्षा जास्त जागा भाजपने जिंकले मात्र आम्हाला राज्यात अपेक्षा प्रमाणे यश मिळालेला नाही.
‘मला सरकारमधून मला मुक्त करावे ‘ फडणवीसांची पक्षश्रेष्टीकडे मोठी मागणी
प्रचारादरम्यान भाजप राज्यघटना बदलेल असा खोटा प्रचार विरोधकांनी केला होता आणि या नेरेटिव्हचा फटका आम्हाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. याच बरोबर राज्यात काही भागात मराठा आरक्षणाचा फटका आम्हाला बसला यामुळे राज्यात एनडीएची कामगिरी ढासळली अशी कबुली देत फडणवीसांनी मला सरकारमधून मोकळा करावे अशी मागणी पक्ष नेतृत्वाकडे केली.