Mahayuti Candidate Hemant Rasane Announced Panchsutri Karyakram : कसबा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पंचसुत्री कार्यक्रम तयार केला आहे. लाडकी बहीण या योजनेकरता आम्ही 28 कॅम्प लावले होते. अशा पद्धतीने सर्वसामान्यांसाठी आणलेल्या शासनाच्या (Assembly Election 2024) योजना, सर्वसामान्यांच्या अडीअडचणी कशा दूर प्रयत्न येईल, असा सातत्याने प्रयत्न केलाय. या प्रयत्नाचाच भाग म्हणून पक्ष नेतृत्वाने यावेळी हेमंत नक्की जिंकू शकेल, या विश्वासाने पुन्हा मला संधी दिली, असं हेमंत रासने लेट्सअप मराठीसोबत बोलताना म्हणाले आहेत.
लोकसभा निवडणुकीत कसब्यातून (Kasba) लीड आणून दाखवला. लोकसभा निवडणुकीत मतमोजणीच्या दिवशी सकाळी मी सांगितलं होतं की, दहा ते पंधरा हजाराने नक्की लीड घेईल, अन् तेच झालं. याही वेळी जनतेच्या आशिर्वादाने आम्हाला लीड नक्की मिळेल, असा विश्वास हेमंत रासने यांनी व्यक्त केलाय. विजय आमचा निश्चित आहे, पण तो किती मताधिक्क्याने होईल, हे जनतेच्या आशिर्वादानेच निश्चित होईल, असं ते म्हणाले आहेत.
पोटनिवडणूक झाल्यानंतर हेमंत रासने यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली, परंतु त्यांनी आक्रमक भूमिका घेतली नाही. यावर प्रतिक्रिया देताना हेमंत रासने म्हणाले की, मूळ माणसाचा स्वभाव असतो. त्यात मला वाचनाची आवड आहे. अनुभव आहे, चिडचिड करून आणि आदळआपट करून काही होत नाही. जर टिकायचं असेल तर तुम्ही शांत राहिलं पाहिजे. संयम असला पाहिजे, कार्यमग्न राहिलं पाहिजे. ज्या दिशेने जायचं त्या दिशेने काम करत राहिलं पाहिजे, असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं.
“‘त्या’ बैठकीला अदानी नव्हते, मध्यस्थीही नाही”; दादांचा २४ तासांच्या आत यू टर्न
माझ्या पक्षाचा अजेंडा मला आवडतो. पक्षाचा विचार मला आवडला म्हणून या पक्षाचा मी कार्यकर्ता झालो. मला जनतेचं काम करायला आवडतं, त्या पद्धतीने जनतेची सेवा करतोय. जनता मला आता संधी देईल, असं वाटतंय. जनतेने मला संधी दिली तर मी कसबा मतदारसंघात खूप चांगला बदल विकासाच्या दृष्टीने घडवेल, असं आश्वासन देखील हेमंत रासने यांनी दिलंय. आमदार म्हणून कसबा मतदारसंघात माझा अजेंडा ठरलेला आहे. पंचसुत्री कार्यक्रमात कचरामुक्त कसबा, ट्राफिकमुक्त कसबा, जुन्या वाड्यांचा प्रश्न सुटलेला कसबा, एसआरएमुक्त कसबा आणि समान पाणीपुरवठा देणारा कसबा याचा समावेश आहे. यापलीकडे देखील खूप काम करायचं आहे. या कसब्याचा मास्टरप्लॅन करून विकास करणार, असं स्वप्न असल्याचं हेमंत रासने म्हणाले आहेत. मी कोणीची स्पर्धा समजत नाही. लोकशाही व्यवस्थेत जनता ज्याच्यावर विश्वास ठेवते, तो निवडून येतो. मला यावेळी जनता नक्की संधी देईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय.