Download App

इंडिया आघाडीत भाजपकडून फूट पाडण्याचा प्रयत्न, खरगेंचं मराठीत खणखणीत भाषण

Mallikarjun Kharge On PM Modi : विरोधकांच्या इंडिया आघाडीत (India Alliance)भाजपकडून (BJP)फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा थेट आरोप कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge)यांनी केला. ते नागपूरमध्ये (Nagpur)कॉंग्रेसच्या (Congress)139 व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित है तैयार हम कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Modi), भाजप आणि आरएसएसवर (RSS)जोरदार हल्लाबोल केला. यावेळी खरगे यांनी मराठी भाषेतून खणखणीत भाषण ठोकलं.

PM मोदींचा स्वभाव, आदेश अन् कार्यपद्धत; राहुल गांधींनी सगळचं बाहेर काढलं

यावेळी मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, देशात भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आम्ही सत्तेत आल्यानंतरच देशाची प्रगती झाली, असा दावा करत आहेत. आणि आत्ता कुठेतरी देश प्रगती करत आहे असं म्हटलं जात आहे. त्यावर खरगे म्हणाले की, मोदी सत्तेत आल्यानंतर म्हणजे 2014 मध्ये स्वातंत्र्य मिळालं आहे का? मोदी आल्यानंतरच देशात शाळा सुरु झाल्या? मोदी आल्यानंतरच मेडिकल कॉलेज सुरु झाले का? सगळं मिळाल्यानंतर आता मोदी गादीवर बसले आहेत.

रामराजे निंबाळकर-मोहिते पाटलांची ‘टाईट फिल्डिंग’; माढ्यात रणजितसिंहांचा गेम होणार?

आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुलेंच्या विचारधारेवर चालतो. पण मोदी आरएसएसच्या विचारधारेवर चालत आहेत. ते समानतेच्या विरुद्ध आहेत. ते आज ना उद्या दलितांना खाली दाबतील, कारण स्कॉलरशिप बंद झाल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला संदेश शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे जर तुम्ही विसरले तर तुम्ही कुठेही राहणार नाही, असेही यावेळी मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले.

नागपूर ही क्रांतीकारकांची भूमी आहे. याच भूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो लोकांना आपल्या विचारधारेतून सामाजिक न्याय दिला. महात्मा गांधींनी देखील वर्धा आणि नागपूरमध्ये दोन हजार सहाशे दिवस या ठिकाणी घालवले आहेत. देशातील कानाकोपऱ्यातून लोकं या ठिकाणी येऊन महात्मा गांधीशी देशाच्या स्वातंत्र्याबद्दल सल्लामसलत करत होते.

या ठिकाणी प्रगतशील विचारधारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आहे. दुसरीकडं आरएसएसचा जन्म याच ठिकाणी झाला. आणि तीच आरएसएस देशाला बरबाद करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आरएसएसचा झेंडा घेऊन पुढे चालले आहेत, आणि त्यांच्या पाठिशी आरएसएस आहे. त्यामुळे तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे, की तुम्ही जोवर उठणार नाहीत तोवर देशात समानतेचा झेंडा फडकवू शकत नाहीत, असा थेट आरोप कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे.

follow us