Download App

‘लाडकी बहीण योजना म्हणजे सावकारी खेळ’; मनोज जरांगेंचा महायुतीवर हल्लाबोल

आमदारने मतदान नाही केलं तर पैसे परत घेऊ, असं म्हटल. हे म्हणजे, मतदान विकत घेतल्यासारखं आहे. - मनोज जरांगे पाटील

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange Patil : महायुती सरकारने (Mahayuti) आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सध्या चर्चेत आहे. ही योजना राज्यात अल्पावधीत लोकप्रिय ठरताना पाहायला मिळत आहे. याच योजनेवरून विरोधक सरकारवर जोरदार टीका करत आहेत. ही योजना म्हणजे, चुनावी जुमला असल्याची टीका होत आहे. दरम्यान, आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनीही या योजनेवर भाष्य केलं.

ऑस्ट्रेलियन संसदेत राणी मुखर्जीने व्यक्त केली ‘ही’ इच्छा; अनेक चर्चांना उधाण 

जरांगे-पाटील यांनी बुधवारी अंतरवली सराटीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी अनेक विषयावर भाष्य केलं. लाडकी बहीण योजनेवर बोलतांना ते म्हणाले, आता समाज पहिल्यासारखा भोळा राहिलेला नाही. पूर्वी समाज भोळा होता, अडाणी होता. जर सरकारनं एखादी योजना आणली तर लोक त्याचा उदो उदो करत असतं. मी या योजनेला नाव ठेवत नाही. ही योजना चांगलीही असेल. पण, आता या योजनेवर शंका उपस्थित होत आहे. कारण, काल तुमच्याच एका आमदारने मतदान नाही केलं तर पैसे परत घेऊ, असं म्हटल. हे म्हणजे, मतदान विकत घेतल्यासारखं आहे. ही योजना म्हणजे सावकारी खेळ आहे
, अशी टीका जरांगेंनी केली.

भावाने मागितलं असतं तर पक्षच काय, सगळंच देऊन…; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान 

आरक्षणावर बोलताना जरांगे म्हणाले, सरकारला मराठा आणि ओबीसी समाजात भांडणं लावायची आहेत, त्यांना दंगलीड घडवायच्या आहेत. सरकारने सरळसरळ फसवा-फसवी केली, अशी टीका जरांगेंनी केली.

फडणवीसांनी फक्त फोडोफोडी केली…
पुढं ते म्हणाले, राज्यात एक संपवा-संपवी खातं निघालं पाहिजे. ते खाते फडणवीस यांच्याकडे दिलं पाहिजे. कारण, फडणवीसांनी मराठा, मुस्लिम, धनगर संपवला. त्यासह मोठ्या जाती संपवण्याचं कामही त्यांनी केलं. पाच वर्षे काम केलं नाही. फक्त फोडोफोडी त्यांनी केली, अशी टीका जरांगेंनी केली.

शिष्यवृत्तीचे पैसे लाडकी बहीण योजनेसाठी-अंधारे
बार्टी, सारथीचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. कारण त्यांच्या संशोधनासाठी त्यांना अद्याप शिष्यवृत्ती देण्यात आलेली नाही. दोन वर्षे झाली तरी शिष्यवृत्तीचे पैसे मिळालेले नाहीत. शिष्यवृत्तीचे पैसे विद्यार्थ्यांना देण्याऐवजी लाडकी बहीण योजनेसाठी पैसे वळवले, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.

follow us