Download App

प्रसाद लाड बांडगूळ, एवढंच प्रेम असेल तर फडणवीसांशी लग्न कर; जरांगेंची जीभ घसरली..

प्रसाद लाड बांडगूळ, एवढंच प्रेम असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्याशी लग्न कर, या शब्दांत मनोज जरांगे यांनी लाड यांचा समाचार घेतला असून यावेळी बोलताना जरांगेंची जीभ घसरलीयं.

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात सध्या चांगलच वातावरण तापल्याचं दिसून येत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासर मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका करीत असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच आता देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे यांना चॅलेंज करताच मनोज जरांगे यांनीही आज त्यांचा चांगलाच समाचार घेतलायं. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी जीभ घसरल्याचं दिसून आलंय. प्रसाद लाड हा भंगार नेता असून बांडगूळ आहे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर एवढचं प्रेम असेल तर लग्न कर, या शब्दांत जरांगेंनी समाचार घेतलायं.

Stree 2 Trailer: ती परत आलीय! राजकुमार राव- श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री 2’ खतरनाक ट्रेलर प्रदर्शित

मनोज जरांगे म्हणाले, प्रसाद लाड देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने बोलत आहेत, लाड हा भंगार नेता असून बांडगूळ आहे, लाड यांना देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एवढचं प्रेम असेल तर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी लग्न करावं, लाडला सांगा माझ्या नादी लागू नकोस, असा इशारा मनोज जरांगे यांनी प्रसाद लाड यांना दिलायं.

मराठा आरक्षणाच्य मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा दुसरा टप्पा पश्चिम महाराष्ट्रातून सुरु झाला आहे. मराठा समाजातील सर्वांनी या शांतता रॅलीमध्ये सहभागी व्हावे असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं असून समाजातील तरुणांनी आत्महत्या केल्यास मी खचून जात आहे, त्यामुळे कोणीही आत्महत्या करु नये, असंही आवाहन मनोज जरांगे यांनी केलंय.

Maharashtra Weather : राज्यात पुढील 5 दिवस महत्त्वाचे, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी; हवामान विभागाचा इशारा

मराठा आरक्षणासाठी आता सध्या मनोज जरांगे यांची शांतता रॅली सुरु असून आता अॅम्बुलन्सद्वारे प्रवास करुन उपोषण करणार असल्याचा इशाराही मनोज जरांगे यांनी यावेळी दिलायं. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत 288 मतदारसंघात उमेदवार उभे करायचे की पाडायचे हे ठरवणार आहोत, असाही इशारा मनोज जरांगे यांनी यावेळी दिला आहे.

काय म्हणाले होते आमदार प्रसाद लाड?
60 वर्षांत जे होऊ शकलं नाही ते देवेंद्रजींनी केलं. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवले. जरांगे पाटील कोणाच्या छत्रछायेखालून हा द्वेष करत आहेत?, हा संशोधनाचा विषय आहे, तुम्हाला माहिती देणारे चुकीची माहिती देतात, असेही लाड यांनी म्हटले आहे. आम्ही तुमचं आवाहन स्वीकारायला तयार आहोत, परंतु तुम्ही चर्चेला तयार आहात का, अशा खडा सवाल लाड यांनी केला आहे. आम्हाला तुमचा अभिमान आहे, परंतु एका विशिष्ठ व्यक्तीला टार्गेट करणे चुकीचे आहे. समाजासाठी लढायचे असेल तर चर्चेतून मार्ग काढणे आवश्यक असल्याचं प्रसाद लाड म्हणाले आहेत.

follow us