मनोज जरांगे मुक्कामी असलेल्या घरावर ड्रोनच्या घिरट्या; नेमका प्रकार काय?

मनोज जरांगे मुक्कामी असलेल्या घरावर ड्रोनच्या घिरट्या; नेमका प्रकार काय?

Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्याबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. त्यांच्यावर पाळत ठेवली जात आहे का? या शंकेला बळ मिळावं अशी (Maratha Reservation) घटना घडली आहे. जरांगे पाटील मुक्कामी असलेल्या घरावर सोमवारी मध्यरात्री एक ड्रोन (Jalna News) फिरत होता. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी घराच्या टेरेसवर येत पाहणी केली. या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता याबाबत पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे. यानंतर आत पोलिसांकडून परिसराची पाहणी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Manoj Jarange: फडणवीस दुश्मन नाही; 13 जुलैचा उल्लेख करत जरांगेंनी सस्पेन्स वाढवाला 

मनोज जरांगे पाटील सध्या आंतरवाली सराटी गावातील सरपंचाच्या घरी आहेत. या घरावर सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक ड्रोन घिरट्या घालत होता. त्यामुळे हा प्रकार काय आहे याची खात्री करण्यासाठी स्वतः जरांगे पाटील यांनी घराच्या टेरेसवर येऊन पाहणी केली. यानंतर आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा केली. गावातील आंदोलनाचे ठिकाण आणि जरांगे राहत असलेल्या घराची टेहळणी सुरू झाल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

या प्रकारानंतर गावचे सरपंच आणि ग्रामस्थांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. आता पोलिसही घटनास्थळी येऊन पाहणी करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याआधी चार दिवसांपूर्वीही अशाच पद्धतीने एक ड्रोन फिरताना दिसून आला होता. आंतरवाली सराटी गावापासून पैठणचे जायकवाडी धरण काहीच अंतरावर आहे. तेव्हा येथे काही दिवसांपूर्वी असाच एक ड्रोन फिरत होतो. आता तो ड्रोन आणि मनोज जरांगे पाटील मुक्कामी असलेल्या घरावर घिरट्या घालणारा ड्रोन एकच आहे का याचीही पाहणी होऊ शकते असे सांगितले जात आहे.

मनोज जरांगेंनी छगन भुजबळ नावाची कावीळ, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.. हाकेंची टीकास्त्र

दरम्यान,  मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 30 जुलैपर्यंत मुदत दिली आहे. त्यांनी 8 जूनपासून पुन्हा उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या चार दिवसांनंतर लगचेच राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेत चर्चा केली. मुदत वाढवून देण्याची विनंती शिष्टमंडळाने केली. यानंतर जरांगे पाटलांनी 13 जुलैपर्यंतची मुदत सरकारला दिली. आता या मुदतीत राज्य सरकार काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube