Download App

Jarange Vs Bhujbal : ‘वयस्कर माणसांकडून चुका होत असतात’; जरांगेंचा भुजबळांना टोला

Manoj Jarange Vs Chagan Bhujbal : ‘वयस्कर माणसांकडून चुका होत असतात, त्यांनी कितीही भांडणं लावली तरीही वाद घालायचा नाही’, असा टोला मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे(Manoj Jarange Patil) यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांना(Chagan Bhujbal) लगावला आहे. जालन्यातील आयोजित ओबीसी एल्गार मेळाव्यातून मंत्री छगन भुजबळांनी मनोज जरांगेंवर सडकून टीका केली होती. भुजबळांच्या टिकेला मनोज जरांगेंनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये आयोजित मराठा आरक्षण मेळाव्यात मनोज जरांगे बोलत होते.

कपिल देवचे व्हिजन, गांगुलचे अ‍ॅग्रेशन अन् धोनीचा संयम : कर्णधार म्हणजे काय रोहितने दाखवून दिले!

मनोज जरांगे म्हणाले, मराठा आरक्षण आणि छत्रपती शिवरायांच्या विरोधात कोणी बोललं तर मी कुणालाच सोडत नाही मग तो कुणीही असो, मराठा असो नाहीतर इतर समाजाचा. आपल्या विजयाचा दिवस जवळ आला आहे त्यामुळे थोडा संयम ठेवलायं नाराजी असेल तरीही ती गिळून घेऊ. एकदा आरक्षण मिळाल्यावर पाहु तो पण आणि आपणही एकाच गल्लीत आहोत तेव्हा पाहुन घेऊ, वयस्कर माणसांकडून चुका होत असतात, त्यांनी कितीही भांडणं लावली तरीही आपण वाद घालायचा नसल्याचं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

नेतन्याहू यांना खटला न चालवता गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे; कॉंग्रेस खासदाराचे वादग्रस्त विधान

छगन भुजबळ काय म्हणाले?
मी मनोज जरांगेंचं काय खाल्लं हे त्यांनी सांगावं. आता जरांगे कुणाचं खातोय? आधी जरागेंची काय परिस्थिती होती, आता काय परिस्थिती आहे? असा सवाल त्यांनी केला. ते म्हणाले, मी ना आरक्षणात शिकलो. ना माझी मुलं आक्षणात शिकली. ओबीसी आरक्षण आम्ही घेतलं नाही, असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले होते.

आपला फोकस आहे, एकच मराठा आरक्षण. ओबीसी बांधवही आपलेच आहेत. काही त्यांकडून दोन समाजात झुंज लावण्याचं काम सुरु आहे पण 24 डिसेंबरला होणारा विजय हा मराठा समाजाला असणार आहे. मराठा एकदाका पेटला की आरक्षण घेतल्याशिवाय सोडत नाही, या शब्दांत जरांगे पाटलांनी विरोधकांनी इशारा दिला आहे.

सध्या नको, सध्या एकदम जवळ दिवस आला आहे. समितीचा पहिला अहवाल स्विकारलायं दुसराही स्विकारतील. सरकारने 24 डिसेंबर तारीख घेतलेली आहे फक्त शक्ती वाढवा गावं तिथं 1 डिसेंबरपासून साखळी उपोषण बसलं पाहिजे, असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजबांधवांना केलं आहे.

Tags

follow us