Download App

‘अभ्यास करुन मराठ्यांच्या पोरांच्या बरगड्या मोडल्या’; जरांगेंनी वडेट्टीवारांना सांगितली सत्य परिस्थिती

Manoj Jarange Patil : अभ्यास करुन मराठ्यांच्या पोरांच्या बरगड्या मोडल्यात, अभ्यास करण्याचं सांगण्याची गरज नसल्याचं खोचक प्रत्युत्तर मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटलांनी दिलं आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार(Vijay Wadettivar) यांनी मराठा आरक्षणावर भाष्य करीत सरकारच्या तीन पिढ्या आल्या तरीही मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण शक्य होणार नसल्याचं विधान केलं होतं. त्यावर प्रत्युत्तरात मनोज जरांगे पाटलांनी(Manoj Jarange Patil) चांगलाच समाचार घेतला आहे.

Kadak Singh Movie: पंकज त्रिपाठींचा ‘कडक सिंह’ सिनेमाचा पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

मनोज जरांगे म्हणाले, सरसकट मराठा आरक्षणावर आम्ही ठाम आहोत, आम्हाला ओबीसीत घ्या आणि मग कितीही टक्के वाढवा, आमची चेष्टा करत असाल तर तुम्हाला अवघड जाईल. २४ डिसेंबरच्या आतच आरक्षण द्यावं. लिखित स्वरुपात दिलेले आश्वसन वेळेत पूर्ण करावं. आम्ही लेकरांच्या न्यायासाठी लढायचं ठरवलं असल्याचंही ते म्हणाले आहेत.

Bigg Boss 17: सुशांत सिंगच्या आठवणीत रडताच अंकिता ट्रोल, चाहत्यांनी टोलर्संना दिलं सडतोड उत्तर

अभ्यास करा हे सांगायची गरज नाही, अभ्यास करुन मराठ्यांच्या पोरांच्या बरगड्या मोडल्या आहेत. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करु नका, आम्ही हिरो नाही झालो. वडेट्टीवारांची विचारधारा मराठ्यांविषयी विष पेरणारी असून वडेट्टीवारांनी मराठ्यांना सल्ले देऊ नये, हिरो शब्द वापरुन वडेट्टीवारांनी संभ्रम निर्माण करु नये, असंही जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं आहे.

दिल्लीत केजरीवाल सरकार पाडणार कृत्रिम पाऊस, 40 टक्के ढग आवश्यक

विजय वडेट्टीवारांना जनतेला न्याय देण्याचं काम आहे, विरोधी पक्ष म्हणून त्यांच्याकडे हे काम दिले आहे. सध्या त्यांना गोरगरिब आठवत नाहीत वाटतं. कोण कोणासाठी आणि कोण राजकारणासाठी करतं आहे हे मराठ्यांना माहित झालं आहे, आम्हाला तुमचे सल्ले द्यायची गरज नाही. मराठ्यांनी तुम्हाला पूर्ण ओळखले असल्याचंही ते म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते वडेट्टीवार?
आरक्षण द्यायचं असेल तर कोणत्याही समाजाला आरक्षणासाठी प्रक्रियेतून जावं लागतं. कोणत्याही समाजाला आपलं शैक्षणिक, सामाजिक मागासलेपणा सिद्ध करावाच लागतो. या प्रक्रियेसाठी राज्य ओबीसी आयोग, मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून सर्वेक्षण करावं लागत असल्याचंही विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. सरकारच्या चार पिढ्या आल्या तरीही मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देणं शक्य नसल्याचंही वडेट्टीवारांनी स्पष्ट केलं होतं.

Tags

follow us