Manoj Jarnage On Cm Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानभवनात गरळ ओकून मराठ्यांची लाट अंगावर घेतली असल्याचं म्हणत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मुख्यमंत्री शिंदेंचा वचपा काढला आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीआधी (Loksabha Eletion) सरकारला घेरण्यासाठी मराठा समाजबांधवांकडून रणनीती आखण्यात येत आहे. त्यासाठी आज मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली अंतरवली सराटीमध्ये महाबैठक पार पडली. या बैठकीत मनोज जरांगे बोलत होते.
अजितदादांच्या खासदारावर शिंदे गटाचा अविश्वास; तटकरेंना विरोध अन् इशाराही एकसाथ
मनोज जरांगे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजाचा द्वेष आहे. मुख्यमंत्री शिंदेंवर मराठ्यांना कमी माया केलेली नव्हती, मराठ्यांना आशा होती की आरक्षण फक्त एकनाथ शिंदेंच देऊ शकतात पण शिंदेंनीही विधानभवनात गरळ ओकली होती. करेक्ट कार्यक्रम करतो असं विधान शिंदेंनी केलं होतं. शिंदेंवर मराठ्यांनी प्रेम केलं पण आता एकनाथ शिंदे मराठा बांधवांच्या नजरेतून उतरले आहेत. काहीही गरज नसताना शिंदेंनी मराठ्यांच्या नाराजीची लाट अंगावर घेतली असल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.
बाबा सिद्दीकीच्या एका शब्दावर अख्खं बॉलिवूड हजर होतं? 2024 मध्ये इफ्तारीत होणार ‘या’ खास गोष्टी
तसेच मराठा अन्याय सहन करु शकत नाही. जे करायचं नाही ते करण्याची वेळ सरकारने मराठ्यांवर आणलीयं. आम्ही सर्व गुन्हे मागे घेणार पण सध्या आचारसंहिता असल्याचं कारण काल देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. मग मागच्या 7 महिन्यात काय होतं? मागच्या सात महिन्यात सगळं बोगंद मोकळचं होतं तेव्हा कुठं होतात तुम्ही? किती वेड्यात काढालंय मराठ्यांना? सगेसोयऱ्याची अंमलबजावणीसाठी तुम्ही बैठक घेतली त्यात नाही केलं, फडणवीसांनीही सांगितल होतं पण नाही झालं, कोणी मिठाचा खडा टाकला माहित नाही ते होऊ दिलं नाही, शेवटचं सांगतो आरक्षणाच लय ताकद आहे उन्हाळ तळतोयं तळा मीही उन्हातच तळतोयं, असा इशाराही मनोज जरांगे यांनी शिंदे-फडणवीसांना दिला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये नाना पटोले यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत विधान केल्यानंतर शिंदे म्हणाले होते, जोपर्यंत लिमिटमध्ये आहे तिथपर्यंत ठिक नाहीतर आपण करेक्ट कार्यक्रमच करतो, असं विधान मुख्यमंत्री शिंदेंनी केलं असल्याचं कथित व्हिडिओतून समोर आलं होतं. त्यानंतर मनोज जरांगे यांच्याकडून शिंदे सरकारला मराठे करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचा इशारा देण्यात आला होता.