Maratha Reservation : आम्ही मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्याशी चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुढील दोन दिवस आपण सरकारसोबत चर्चेसाठी तयार असल्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर आता मनोज जरांगेंच्या आवाहनाला शंभूराज देसाईंनी प्रतिसाद दिला आहे. देसाई यांनी नागपुरातून माध्यमांशी संवाद साधला आहे.
Maratha Reservation : ‘जीव धोक्यात गेल्याशिवाय समाजाचं..,’; जरांगे पाटलांनी थेट सांगून टाकलं
शंभूराज देसाई म्हणाले, मनोज जरांगे यांना उपोषण सुरु करताना राज्य सरकारच्यावतीने मंत्री गिरीष महाजन यांनी उपोषण न करण्याची विनंती केली होती. मात्र, त्यांनी उपोषाची घोषणा केली. त्यानंतर लगेचच गावात राजकीय पुढाऱ्यांनी येऊ नये, असंही ते म्हणाले होते. आम्हीही मराठाचं आहोत, तेव्हा आम्ही गावात गेलो असतो तर समाजाच्या भावना तीव्र झाल्या असत्या, त्यामुळेच आम्ही जाणं टाळलं होतं, आता जरांगे चर्चेला तयार असतील तर आम्ही चर्चेसाठी तयार असल्याचं शंभूराज देसाईंनी स्पष्ट केलं आहे.
ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर तेली समाज…; भाजप खासदाराने राज्य सरकारला कोंडीत पकडलं
तसेच मी याआधीही मनोज जरांगे यांना वर्षा बंगल्यावर भेटून समजावून सांगितलं आहे. माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीच्या कामाची पद्धत न्यायालयीन प्रक्रियेनूसार आहे. त्यामुळे अहवाल सादर करण्यासाठी थोडा वेळ लागत आहे. तेलंगणा सरकारच्या ताब्यात कागदोपत्रे आहेत, त्यासाठी समितीला वेळ लागत असून समितीचा अहवाल लवकरच येणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.
मी ब्राह्मण असल्याने मला टार्गेट केलं जातंय, मराठा आरक्षणावरुन फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
मागील पाच दिवसांपासून अंतरवली सराटीत मनोज जरांगेंचं आमरण उपोषण सुरु आहे. अशातच आता त्यांची तब्येत खालावली असून त्यांनी वैद्यकीय सेवाही नाकारल्या आहेत. त्यांच्या पोटात दुखू लागलं. तरीही ते उपोषण करत आहे. बोलतांना त्यांना धाप लागत आहे. त त्यांची तब्येत खालावल्यानं त्यांचं कुटुंब आंदोलनस्थळी आलं आहे. यावरू जरांगे पाटील संतापले होते. ते म्हणाले, प्रत्येकाचं आपल्या कुटुंबावर प्रेम असतं. तसंच माझंही आहे. मात्र आंदोलन करताना मी कुटुंबाचा नसतो, तर मराठा समाजाचा असतो. यापुढं माझ्या कुटुंबाला माझ्यासमोर आणू नका. कारण प्रत्येकाला आपली लेकरं, माय-बाप पाहिल्यावर माया येते. त्यामुळं त्याच्या शरीरावर परिणाम होण्याची शक्यता असते.
ते म्हणाले की, आपलं कुटुंब पाहिल्यावर हुंदका दाटून येतो. त्यामुळे दोन दिवस जास्त उपोषण करायचं असेल तर ते होत नाही. म्हणून मी खवळलो. तुमच्यावर रागवायला मी मूर्ख नाही. जर कोणालाही आपलं कुटुंब समोर दिसलं तर हुंदका भरून येतो आणि माणूस दोन पावलं मागं येत असतो. याचा विचार करा, असं जरांगे म्हणाले.