Amit Shah On India Alliance Leader : देशात विरोधकांना अस्थिर सरकार आणायचं असून देशातल्या जनतेचा इंडिया आघाडीवर (India Alliance) विश्वास नसल्याचा हल्लाबोल केंद्रीय मंत्री अमित शाहा (Amit Shah) यांनी केलायं. दरम्यान, एनएनआयला दिलेल्या मुलाखतीत अमित शाहा यांनी विविध मुद्द्यांवर थेट भाष्य करीत इंडिया आघाडीची पोलखोलच केलीयं.
महागाईत दिलासा! अत्यावश्यक 41 औषधांच्या किमती होणार कमी, सरकारचा मोठा निर्णय
अमित शाहा म्हणाले, दरवर्षी एक पंतप्रधान आणणार असल्याचं विरोधकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे देशात अस्थिर सरकार त्यांना हवं असून देशातील जनतेचा त्यांच्यावर विश्वास नाहीये. स्थिर सरकारमुळे अनेक फायदे होतात, हे जनतेला माहिती असून अस्थिर सरकारमुळे देशाने नुकसान भोगलं आहे. मागील दहा वर्षांत मोदींच्या नेतृत्वात सरकार स्थिर मिळाल असून मोदींवर देशातील जनतेला विश्वास असल्याचंही मोदींनी स्पष्ट केलंय.
पृथ्वीराज चव्हाणांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यासाठी बसावं, अजित पवार गटाचा टोला
आमच्याकडे बहुमत असूनही दुरुपयोग करीत नाही :
विरोधकांकडून संविधान बदलणार असल्याचा आरोप केला जात आहे. आमच्याकडे मागील 10 वर्षांपासून बहुमत आहे. तरीही आम्ही बहुमताचा दुरुपयोग करीत नाही. आम्हाला लोकसभेत 400 जागा जिंकायच्या असून देशात स्थिरता आणायची असल्याचंही अमित शाहांनी सांगितलं आहे.
मोफत उपचार अन् शुद्ध पाणी देण्यासाठी 400 जागा हव्यात..
देशातील नागरिकांच्या घरात आम्हाला घरात शुद्ध पाणी पोहोचवणं बाकी असून देशातील प्रत्येक नागरिकांना मोफत उपचार देण्यासाठी आम्हाला 400 जागा हव्या असल्याचं अमित शाहांनी सांगितलं आहे.
बहुमताच्या दुरुपयोगाचा इतिहास आमच्या पक्षाचा नाही…
मागील 10 वर्षात कलम 370, तिहेरी तलाक, सारखे कायदे आम्ही रद्द केले आहेत. तसेच राम मंदिर आणि समान नागरी कायदा आणलायं. आम्ही आमच्या बहुमताचा वापर संविधान सभेने देशाला जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करण्यासाठी केलायं. हुमताच्या दुरुपयोगाचा इतिहास आमच्या पक्षाचा नाही. इंदिरा गांधींच्या काळात काँग्रेसनं केला. संविधानात बदल केले, लोकसभेचा कार्यकाळ वाढवला. आणीबाणी आणली. कुठल्याही कारणास्तव सव्वा लाख लोकांना १९ महिने जेलमध्ये बंद केले असा आरोप अमित शाह यांनी काँग्रेसवर केला आहे.