Girish Mahajan On Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarnage) यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आता त्यांची एसआयटी चौकशी करण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून मनोज जरांगे यांच्या एसआयटी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर आता भाजपच्या नेत्यांकडूनही मनोज जरांगे यांच्यावर संताप व्यक्त केला जात असल्याचं दिसून येत आहे. मनोज जरांगेंनी मर्यादेत रहावं, राजकारण तुमचं काम नाही तुम्हाला आता माफी नाही, या शब्दांत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी सुनावलं आहे.
Letsupp Exclusive : संभाजीराजेंचा पत्ता कट; कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती काँग्रेसचे उमेदवार
मनोज जरांगेंनी आमरण उपोषण केल्यानंतर त्यांनी अंतरवाली ते मुंबई अशी पदयात्रा काढली होती. ही पदयात्रा मुंबईच्या वेशीवर जाताच राज्य सरकारकडून मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. मनोज जरांगे यांच्या मागणीचा अध्यादेशच सरकारने मनोज जरांगे यांच्याकडे सोपवला होता. त्यानंतर जरांगे यांनी आंदोलन स्थगित केल्याचं दिसून आलं. मात्र, 10 फेब्रुवारीपासून पुन्हा जरांगेंनी सगेसोयरेच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरु केलं होतं. या उपोषणाच्या 16 व्या दिवशी मनोज जरांगेंचं आक्रमक रुप पाहायला मिळालं होतं.
धक्कादायक! अकोल्यात शालेय पोषण आहारातून 10 विद्यार्थ्यांना विषबाधा; रुग्णालयात दाखल
मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद सुरु असतानाच त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अपशब्द वापरत गंभीर आरोप केल्याचं दिसून आले होते. एवढंच नाहीतर मनोज जरांगे यांची स्वारी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे निघाली होती. मात्र, समाजबांधवांवर गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर ते माघारी फिरले होते. मनोज जरांगे यांनी फडणवीस यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यावरुन गदारोळ झाला. त्यानंतर राहुल नार्वेकरांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते.
माजी आमदाराच्या हत्येसाठी सिद्धू मुसेवाला पॅटर्न; भाजपच्या माजी आमदाराचा हात !
यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले, मनोज जरांगे पाटलांना आम्ही खूप सहकार्य केलं आहे. पण मनोज जरांगे ऐकायला तयार नाहीत. आम्ही जरांगे यांच्या म्हणण्याप्रमाणे सर्वकाही केलं. तरीदेखील मी म्हणेन तेच करा, नसेल करायचं तर तुमचा सत्यानाश करून टाकेन, तुमचा पक्ष संपवून टाकेन, तुम्हाला पदावरून खाली उतरवेन अशी वक्तव्ये त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत त्यांनी चुकीचं भाष्य केलं. छगन भुजबळांबाबतही तेच केलं. परवा तर त्यांनी कळसच केला. त्यांनी थट उपमुख्यमंत्री देवेंद्र यांना जातीवाचक शिविगाळ केली. त्यांचं नाव घेऊन आई-बहिणीचा उल्लेख केला. मनोज जरांगे यांनी मर्यादेत रहावं राजकारण करणं त्यांचं काम नसून त्यांना आता माफी नसल्याचं गिरीश महाजन म्हणाले आहेत.