महात्मा गांधींना काय ठाकरे अन् राऊतांनी घडवलयं का? गिरीश महाजनांचा सवाल
Girish Mahajan : महात्मा गांधी यांना उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) आणि संजय राऊतांनी (Sanjay Raut) घडवलयं का? असा उपरोधिक सवाल करीत मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी खोचक टीका केली आहे. दरम्यान, राम मंदिर सोहळ्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यावर गिरीश महाजनांनी प्रत्युत्तर दिलं आहे. धुळ्यात आज पाणी पुरवठा योजनेचं लोकार्पण आज गिरीश महाजनांच्या हस्ते पार पडलं. यावेळी महाजनांनी माध्यमांशी संवाद साधला.
शरद पवारांकडून मुरकुटेंना राष्ट्रवादीची ऑफर… मुरकुटेंनी स्पष्ट केली भूमिका
गिरीश महाजन म्हणाले, महात्मा गांधींना काय उद्धव ठाकरे यांनी घडवलं की संजय राऊतांनी घडवलं? संजय राऊत यांना व्हरबल डायऱ्या झालं असल्यासारखं ते सकाळी उठून बडबड करीत असतात, त्यांचा पक्ष तरी त्यांचा राहिला आहे का? आठ-दहा आमदार त्यांच्याकडे उरले आहेत, अशा आठ-दहा आमदार असलेल्यांना अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी तिथं बोलावलं तर तेथे जागाच उरणार नाही. म्हणूनच उद्धव ठाकरे यांना आमंत्रण केंद्र सरकारच्यावतीने निमंत्रण देण्यात आलं नसल्याची टीका गिरीश महाजनांनी केली आहे.
हळद उतरण्यापूर्वीच सासरच्या लोकांना बेशुद्ध करून नववधू पळाली; लाखोंचा मुद्देमालावरही डल्ला
तसेच यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांच्या जागावाटपाच्या मुद्द्यावरुनही जोरदार हल्लाबोल केला आहे. चारही पक्षांना माझ्या शुभेच्छा असून राज्यात चारही पक्षांनी एकत्र येऊन जागा वाटपाचा फॉर्मुला ठरवावा त्यानंतर निवडणुका लढवाव्यात. कितीत जागा निवडून येतील तेही त्यांनी बघावं, अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केलीयं. तसेच चारही पक्षांनी जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार करून मोदीविरोधात निवडणूक लढवावी, जिंकून दाखवावी असं खुलं चॅलेंजही महाजनांनी विरोधकांना दिलंय.
रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणीत वाढ, मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने प्रथमच घेतले नाव
दरम्यान, धुळ्यात पाणी पुरवठा योजनेचं लोकार्पण पार पडलं. असून धुळे जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न मोठा होता. इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मागणीवरुन आज पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. तसेच अक्कलपाढा धरणाचंही काम आता प्रगतीपथावर असून आज धुळे जिल्ह्यासाठी 170 कोटी रुपयांचा निधी देऊन पाण्याचा प्रश्न मिटवला असल्याचं महाजनांनी स्पष्ट केलं आहे. महायुतीच्या जागावाटपासंदर्भात महायुतीच्या तीनही पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीतीलवरिष्ठ यांच्यात चर्चा झल्यानंतरच जागा वाटपाचा निर्णय होणार असल्याचं महाजन यांनी स्पष्ट केलं आहे.