Download App

हर्षल पाटीलच्या नावावर कोणतंच काम नाही, गुलाबराव पाटलांचा धक्कादायक खुलासा

Minister Gulabrao Patil On Harshal Patil Contract : सांगलीच्या एका हर्षल पाटील ( Harshal Patil) नावाच्या अभियंत्याने आत्महत्या केली आहे. तो जलजीवन मिशनचा अभियंता असल्याचं सांगितलं जातंय. याप्रकरणी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं वक्तव्य केलंय. गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय की, त्या अभियंत्याचं नाव हर्षल पाटील (Minister Gulabrao Patil) आहे. परंतु त्यांच्या नावावर कुठलंच काम नाही. त्या योजनेवर कोणतंच बिल पेंडिंग नाही. एखाद्यावेळी त्यांनी दुसरं काम घेतलेलं असावं, परंतु त्याची नोंद जिल्हा परिषदेकडे नाही. आमच्या कार्यालयातून संपर्क झाला आहे. मी स्वत: कार्यकारी अभियंत्यांशी बोललो आहे. त्यांचा या गोष्टीशी कोणताही (Jaljeevan Mission) संबंध नाही. सब्लेट काम केलं असेल, तर त्याची कल्पना नाही, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय.

3800 कोटीच्या वरचा प्रस्ताव

जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय की, निश्चितपणे बिलं थकित आहेत. आम्ही विधानसभेच्या सभागृहात आम्ही स्वीकारलं आहे. ही स्थिती एकट्या महाराष्ट्र राज्याची नाही, तर देशाची आहे. 3800 कोटीच्या वरचा प्रस्ताव आम्ही वित्त खात्याकडे दिला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बोलणं झालेलं आहे. सरकार आहे. थोड्या गोष्टीमागे पुढे होत असतात. परंतु याचा बवाल करू नये, असं देखील गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

मोठी बातमी! अनिल अंबानींविरुद्ध ED ची कारवाई; तब्बल 50 ठिकाणी टाकले छापे

सरकारच्या विविध योजनांअंतर्गत ठेकेदारी

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी गावात एक धक्कादायक घटना घडली. हर्षल पाटील या स्थानिक सरकारी कंत्राटदाराने आत्महत्या केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सरकारी कामाचा मोबदला वेळेत न मिळाल्यामुळे आलेल्या मानसिक तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप संबंधित कंत्राटदार संघटनेकडून करण्यात आला आहे. हर्षल पाटील यांनी राज्य सरकारच्या विविध योजनांअंतर्गत ठेकेदारी केली होती. मात्र, काम पूर्ण करूनही त्यांना त्यांच्या बिलांचा मोबदला मिळत नसल्याने ते गेल्या काही काळापासून नैराश्यग्रस्त होते, अशी माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली. या प्रकारामुळे सरकारी यंत्रणेवर पुन्हा एकदा बोट ठेवले जात असून, शासनाच्या विलंबित देयक प्रणालीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्या, माणिकराव दिलखुलास पण… विखेंचा कोकाटेंना सल्ला अन् रोहित पवारांना टोला

आत्महत्या का केली?

हर्षल पाटील यांच्या आत्महत्येची माहिती समोर आल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. सरकारी यंत्रणेतील ढिसाळ कारभार आणि वेळेवर निधी वितरण न होणे, अशा घटनांना कारणीभूत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला. या प्रकरणात जलजीवन मिशनचा संदर्भ दिला जात असला तरी सांगली जिल्हा परिषदेचे विशेष कार्यकारी अधिकारी यांनी त्यावर स्पष्ट भूमिका घेतली आहे. हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशनअंतर्गत सांगली जिल्ह्यात कोणतेही ठेके घेतले नव्हते. त्यामुळे जलजीवन मिशनच्या देयकामुळे आत्महत्या केल्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केलंय.

 

follow us