Rohit Pawar : ‘त्या’ दोन नेत्यांची नावं जाहीर कराच! शिरसाटांचं रोहित पवारांना थेट चॅलेंज

Rohit Pawar : राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर राज्य सरकारकडून कारवाई करण्यात आली. मध्यरात्री दोन वाजता महाराष्ट्र प्रदूषण विभागाने नोटीस देत 72 तासांत दोन प्लांट बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्वतः रोहित पवार यांनी या कारवाईबाबत ट्विट करुन माहिती देत दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरुन ही […]

Rohit Pawar And Sanjay Shirsat

Rohit Pawar And Sanjay Shirsat

Rohit Pawar : राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर राज्य सरकारकडून कारवाई करण्यात आली. मध्यरात्री दोन वाजता महाराष्ट्र प्रदूषण विभागाने नोटीस देत 72 तासांत दोन प्लांट बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्वतः रोहित पवार यांनी या कारवाईबाबत ट्विट करुन माहिती देत दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरुन ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप केला होता. या घडामोडींनंतर आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी थेट रोहित पवार यांना आव्हान दिले आहे. रोहित पवार ज्या दोन नेत्यांवर आरोप करत आहेत त्यांची नावे त्यांनी जाहीर करावीत, असे आव्हान आ. शिरसाट यांनी दिले.

Sharad Pawar : रोहित पवारांच्या कंपनीवर कारवाई; शरद पवार म्हणाले, मी उत्तर..

आमदार शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना रोहित पवार यांच्या कारखान्यावरील कारवाईबाबत प्रश्न विचारला. त्यावर शिरसाट म्हणाले, रोहित पवार यांच्या कारखान्यावर जी कारवाई झाली ती नियमानुसारच झाली आहे. अनेक दिवसांच्या चौकशीनंतरच कारवाई होत असते. रोहित पवार म्हणतात यामागे दोन बडे नेते आहेत मग त्यांनी त्यांचे नाव सांगितले पाहिजे. नाहीतर तुमच्या या आरोपांना कवडीचीही किंमत राहत नाही. या प्रकरणावर शरद पवार जर काही बोलत नसतील तर ही कारवाई योग्यच असावी असे संकेत यातून मिळत आहेत. भविष्यात काय घडणार याची कल्पना पवार साहेबांना आली असावी असं मला वाटतं. त्यामुळे रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांत काही अर्थ नाही, असे शिरसाट यांनी स्पष्ट केले.

शरद पवारांचे मौन

रोहित पवार यांच्या कारखान्यावरील कारवाईसंदर्भात काल प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी मात्र उत्तर न देणेच पसंत केले. यावर मी काही उत्तर देणार नाही असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. त्यांच्या या मौनानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लढवण्यात येत आहेत.

Pankaja Munde : ‘मलाही मुंबईत घर मिळत नव्हतं’; पंकजा मुंडेंनी सांगितला ‘तो’ किस्सा…

रोहित पवार काय म्हणाले होते ?

राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे दोन वाजता राज्य शासनाच्या एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली. युवा मित्रांना एकच सांगू इच्छितो की, संघर्ष करतांना भूमिका घेताना अनेक अडचणींचा सामना करावाच लागतो. मी बोलतो, ठोस भूमिका घेतो म्हणून मला अडचणीत आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत, परंतु अडचणी आल्या म्हणून संघर्ष थांबवायचा नसतो अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी या कारवाईवर दिली होती.

Exit mobile version