Santosh Bangar : हळद संशोधनाच्या मंजुरीसाठी मी आणि खासदार हेमंत पाटील दहावेळा उद्धव ठाकरेंकडे गेलो पण एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्येच हळद संशोधन केंद्र तत्काळ मंजूर झाले, असल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर(Santosh Bangar) यांनी केला आहे. एका कार्यक्रमादरम्यान आमदार संतोष बांगर बोलत होते.
आम्हाला वाद वाढवायचा नाही, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो नरमले
संतोष बांगर म्हणाले, हिंगोलीत झालेल्या हळद संशोधन केंद्राचं श्रेय अनेक नेते घेत आहेत, मात्र, या विकासकामांचं खरं श्रेय हेमंत पाटलांचं आहे. हळद संशोधन केंद्राच्या मंजुरीसाठी हेमंत पाटील व मी दहा दहा वेळा उद्धव ठाकरे यांच्याकडे जात होतो मात्र तरीही काम होत नव्हते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामासाठी अतिशय तात्काळ मंजुरी दिल्याचे बांगर यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
नांदेड दुर्घटना! दुरावस्था पाहून खासदार भडकले; डीनच्या हातात मॉप देत शौचालयं साफ करुन घेतलं…
तसेच उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात मतदारसंघातील विकासकामांसाठी निधीच मिळत नव्हता, फायलींवर सही करायला त्यांचा हातच चालत नव्हता, असा आरोपही शिंदे गटाच्या आमदार आणि मंत्र्यांनी वारंवार केलेले आहेत. आता हिंगोलीच्या हळद संशोधन केंद्राचे श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देतांनाच ठाकरेंवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
अश्रूंची किंमत सरकारला मोजावी लागेल, नांदेडच्या घटनेवरून जयंत पाटलांची सरकारवर सडकून टीका
खासदार हेमंत पाटलांनी हिंगोली जिल्ह्यातील बिनविरोध निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणा केली होती. ती मदत प्रत्यक्ष आज भास्कर पेरे पाटील यांच्या उपस्थितीत देण्यात आली.
मलाच का बोलता? सर्वांना बोला, नाहीतर त्याला राजकारणाचा वास येईल; भुजबळांचं जरागेंना प्रत्युत्तर
ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होणे ही गावाच्या विकासासाठी खूप चांगली बाब आहे.यामुळे गावातील भांडण तंटे कमी होऊन गावाचा विकास होतो, असे मत आदर्श गावचे माजी सरपंच भास्कर पेरे यांनी व्यक्त केले.
दरम्यान, बिनविरोध निवड झालेल्या ग्रामपंचायतला निधी देण्याचा खासदार हेमंत पाटील यांचा उपक्रम अतिशय अभिनंदनास्पद आहे. प्रत्येक सरपंचानी आपल्या गावात स्वच्छ पाणी द्यावे, भरपूर झाडे लावावीत, मुलांना चांगले शिक्षण द्यावे, गावात स्वच्छता असावी, असा कानमंत्र पेरे पाटील यांनी उपस्थित सरपंचाना दिला.