आम्हाला वाद वाढवायचा नाही, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो नरमले

आम्हाला वाद वाढवायचा नाही, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो नरमले

India Canada Conflict : गेल्या काही दिवसांपासून खलिस्तानी समर्थक हरदीपसिंग निज्जरच्या (Hardeep Singh Nijjar) हत्येवरून भारत आणि कॅनडामध्ये वाद सुरूच आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांच्या उच्च अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. कॅनडा खलिस्तानींना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप भारताने जागतिक पातळीवर अनेक ठिकाणी केला होता.त्यानंतर आता कॅनडाचे पंतप्रधान नरमल्याचं पाहायला मिळत आहे. जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) म्हणाले की, आम्हाला वाद आणखी पुढे नेायचा नाही.

जस्टिन ट्रुडो म्हणाले, कॅनडाला भारतासोबतचा वाद वाढवायचा नाही. जबाबदारीने आणि रचनात्मकपणे नवी दिल्लीशी संवाद साधत राहणार आहेत. भारतातील कॅनेडियन कुटुंबांना मदत करण्यासाठी आम्हाला तेथे यायचे आहे.

ट्रुडोचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा भारतने कॅनडाला 40 राजनयिकांना देश सोडण्यास सांगितले आहे. अन्यथा राजनयिकांना मिळणाऱ्या सुविधा रद्द केल्या जातील. सरकारने 10 ऑक्टोबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. नुकतेच परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते की, कॅनडाचे भारतात आवश्यकतेपेक्षा जास्त मुत्सद्दी आहेत, त्यामुळे समतोल निर्माण करण्याची गरज आहे.

वादाला का सुरुवात झाली?
दरम्यान, गेल्या काही दिवसांत भारत आणि कॅनडामधील वाद समोर आला होता. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिस ट्रूडो यांनी निज्जरच्या हत्येत भारतीय एजंटचा हात असू शकतो असा दावा केला होता. भारत सरकारने या दाव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.

मंत्रिमंडळ विस्तार अन् पालकमंत्री पदावरुन अजितदादा नाराज; तटकरे म्हणाले, ‘विरोधकांनी अफवा पसरवली’

कॅनडाचे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते. कॅनडा हे फुटीरतावाद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान बनले आहे. इशारा देऊनही कॅनडाच्या सरकारने अशा घटकांवर कारवाई केली नाही, असेही भारताने म्हटले आहे.

‘आता तुम्ही गप्प बसा’; शरद पवारांच्या ‘त्या’ मागणीवर जरागेंचं रोखठोक भाष्य

एस जयशंकर काय म्हणाले?
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अलीकडेच सांगितले की, कॅनडियन लोकांनी काही आरोप केले आहेत. आम्ही त्यांना सांगितले आहे की हे भारत सरकारचे धोरण नाही, परंतु जर ते आमच्याशी संबंधित माहिती सामायिक करण्यास तयार असतील तर आम्ही त्याकडे लक्ष देण्यासही तयार आहोत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube