मंत्रिमंडळ विस्तार अन् पालकमंत्री पदावरुन अजितदादा नाराज; तटकरे म्हणाले, ‘विरोधकांनी अफवा पसरवली’

मंत्रिमंडळ विस्तार अन् पालकमंत्री पदावरुन अजितदादा नाराज; तटकरे म्हणाले, ‘विरोधकांनी अफवा पसरवली’

Sunil Tatkare on Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकरणात पुन्हा उलथापालथ होण्याची चर्चा आहे. राष्ट्र्वादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) नाराज असल्याची चर्चा आहे. यामुळे मंत्रिमंडळ बैठकीला अजित पवार उपस्थित नव्हते. तसेच दिल्लीतील बैठकीला देखील गेले नाहीत. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. यावर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) म्हणाले की ते नाराज असल्याची विरोधकांकडून जाणीवपूर्वक अफवा पसरवली जात आहे. यात कोणतेही तथ्य नाही.

आतापर्यंत सरकारमध्ये असताना अजित पवार यांनी मंत्रिमंडळ बैठक, शासकीय बैठकीला उपस्थित राहिले आहेत. कोरोना काळात देखील त्यांनी बैठका घेतल्या होत्या. त्यामुळे अन्य कारणांनी अजित पवार कधीही बैठकीला अनुपस्थित राहिले नाहीत, असे तटकरे यांनी सांगितले.

पालकमंत्री आणि मंत्रिमंडळ विस्तार या दोन कारणांनी अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. यावर तटकरे म्हणाले की केवळ प्रकृती खराब असल्याने आज बैठकीला उपस्थित नव्हते. आमदारांच्या बैठकीला देखील उपस्थित नव्हते. केवळ गैरसमज निर्माम करण्यासाठी अफवा पसरवली जात आहे. विरोधकांचा हा प्रयत्न चुकीचा आणि निंदनीय आहे, असे सुनिल तटकरे यांनी सांगितले.

‘आता तुम्ही गप्प बसा’; शरद पवारांच्या ‘त्या’ मागणीवर जरागेंचं रोखठोक भाष्य

गेल्या महिन्यांपासून दर मंगळवाली आम्ही अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर बैठक घेत असतो. राष्ट्रवादीचे सर्व मंत्री, पक्षाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहत असतात. विकास कामे आणि मतदार संघनिहाय वेगवेगळ्या विषयावर चर्चा होत असते. आज त्यांच्या घरी बैठक झाली पण ते बैठकीला उपस्थित नव्हते. त्यामुळे आज मंत्रिमंडळाच्या बैठकीला देखील उपस्थित नव्हते, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.

Ahmednagar Loksabha : विखे-गडाख लढत-1991ची अहमदनगर लोकसभा देशभर का गाजली ?

ते पुढं म्हणाले की आज पक्ष कार्यालयात ओबीसी सेलची बैठक झाली. पण त्या बैठकीला देखील अजित पवार उपस्थित नव्हते. काही वेळापूर्वी आमदारांची बैठक झाली, त्या बैठकीला प्रकृती खराब असल्याने उपस्थित नव्हते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube