Download App

रामाच्या दर्शनाचं अमिष का दाखवता? अयोध्यावारीच्या घोषणेवरुन राज ठाकरे कडाडले…

Raj Thackeray On BJP : रामाच्या दर्शनाचं अमिष का दाखवता? असा उपरोधिक सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी भाजपला केला आहे. देशातील पाच राज्यांच्या निवडणुक प्रचारात मोफत अयोध्यावारी घडवणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अमित शाह(Amit Shah) यांनी केली आहे. भाजपच्या या घोषणेवरुन राज ठाकरे यांनी चांगलंच धारेवर धरलं आहे. राज ठाकरे यांनी आज ठाण्यातून माध्यमांशी संवाद साधला आहे.

अदानींचे माजी सल्लागार केंद्राच्या मंजुरी समितीत; महाराष्ट्रातील बड्या प्रकल्पाला ‘वायुवेगाने’ मान्यता

राज ठाकरे म्हणाले, भाजपने टूर अॅण्ड ट्रॅव्हल्स नावाने नवीन खातं उघडलंय का? तुम्ही काय कामे केली आहेत त्यावर निवडणूका लढवा, रामाच्या दर्शनाचं अमिष का दाखवता? इतकी वर्षे सत्तेत आहात, तेवढ्या वर्षांत तुम्ही काय काय केलं ते लोकांसमोर येणं गरजेचं आहे, बघुयात आता पुढे काय निकाल लागतो, या शब्दांत राज ठाकरेंनी भाजपला धारेवर धरलं आहे.

‘देव हा सर्वोत्कृष्ट…’, विराटचं ऐतिहासिक शतक अन् अनुष्काची Insta Story… पतीसाठीची पोस्ट चर्चेत

1999 पासूच जातीबद्दल द्वेष निर्माण झालायं…
राज्यात जात ही गोष्ट अनेकांना प्रिय असते, आवडते. स्वत:च्या जातीचा अभिमान असणं हे आजपर्यंत राज्यात होत होतं. मात्र, 1999 साली जेव्हा राष्ट्रवादीची स्थापना झाली. त्यानंतर स्वत:च्या जातीपेक्षा दुसऱ्यांच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणं हे जन्माला आलं असंच वागलो तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश व्हायला वेळ लागणार नाही. स्वार्थी लोकांच्या राजकारणासाठी आपण महाराष्ट्र खड्ड्यांत घालतोयं, असंही ते म्हणाले आहेत.

करणने विचारले दीपिकाला स्पर्धा मानते का? करीनाने थेटच सांगितलं, हा प्रश्न आलियाला…

काय म्हणाले होते अमित शाह?
मध्य प्रदेशात जनतेला संबोधित करताना राज्यात भाजपचे सरकार आल्यास अयोध्येत रामलल्लाचे मोफत दर्शन देणार असल्याचं अमित शाह यांनी घोषित केलं. जर मध्य प्रदेशात भाजपचे सरकार बनले तर रामलल्लांच्या दर्शनाचा खर्च भाजप उचलणार आहे. तुम्ही 3 डिसेंबरला भाजपचे सरकार बनवा, भाजपचे मध्य प्रदेश सरकार तुम्हाला रामलल्लाचे दर्शन मोफत करून देण्यासाठी मदत करणार असल्याचं शाह यांनी स्पष्ट केलं होतं.

Ajit Pawar : दिवाळी संपताच अजितदादांची खलबत; निधी वाटपावरून आमदारांची नाराजी दूर होणार?

उद्धव ठाकरेंचीही टीका :
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘बजरंगबली की जय’ म्हणत मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. गृहमंत्री अमित शाह यांनी मध्य प्रदेशात ‘रामल्लाचे दर्शन मोफत घडवू’ असं जाहीर केलं आहे. अमित शाहांनी फक्त मध्य प्रदेशपुरतं ही घोषणा करू नये. देशातील कानाकोपऱ्यात रामभक्त आहेत. त्या भक्तांना सोयीनुसार मोफत अयोध्यावारी करवावी, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, मध्य प्रदेशातील 230 जागांसाठी उद्या 17 नोव्हेंबरला मतदार पार पडणार असून 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आणण्यासाठी भाजपकडून मोठ-मोठ्या घोषणा केल्या जात आहेत. त्यावरुन विरोधकांकडूनही टीकेची झोड उठवली जात आहे.

Tags

follow us