‘देव हा सर्वोत्कृष्ट…’, विराटचं ऐतिहासिक शतक अन् अनुष्काची Insta Story… पतीसाठीची पोस्ट चर्चेत
Anushka Post For Virat Kohli: विराट कोहलीने (Virat Kohli) भारत- विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) विश्वचषक उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान त्याचे 50 वे एकदिवसीय शतक पूर्ण केले आहे. (World Cup) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळल्या गेलेल्या या सामन्यादरम्यान त्याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) देखील उपस्थित होती. आपल्या पतीचे यश पाहून खूप उत्साहित आणि आनंदी दिसत होती. तो स्टेडियममध्ये विराटला फ्लाइंग किस देताना देखील बघायला मिळाली आहे. आणि आता त्याने 50 वे शतक पूर्ण झाल्यावर विराटसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.
अनुष्का शर्माने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर तिच्या क्रिकेटर पतीचे तोंडभरून कौतुक केले आहे आणि त्याला गॉड चाइल्ड म्हटले आहे. तिने पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘ देव सर्वात सुंदर स्क्रिप्ट रायटर आहे. तुझे प्रेम मला मिळाल्याबद्दल मी त्याचे आभार मानते. तुला दिवसेंदिवस अधिक सामर्थ्यवान बनताना आणि तु तुला हवे ते सर्व साध्य करतान बघणे हे खूपच समाधानकारक आहे. तू नेहमीच स्वत:शी आणि तुझ्या क्रिकेटशी प्रामाणिक राहिला आहेस. खरंच तू गॉड चाईल्ड आहेस.’
विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 वे शतक झळकावून क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. या सामन्यादरम्यान सचिन तेंडुलकरही स्टेडियममध्ये उपस्थित होता. अशा स्थितीत विराटने शतक झळकावल्यावर तो सचिनसमोर नतमस्तक होऊन क्रिकेटच्या मैदानावर त्याला नमस्कार करताना दिसला. सचिनने विराटच्या विजयाबद्दल अभिनंदन आणि खास पोस्टही लिहिली आहे.
Nana Patekar: व्हायरल व्हिडिओवर नाना पाटेकरांचे स्पष्टीकरण, म्हणाले, “मी कोणालाही…”
अनुष्का शर्मा गेल्या काही दिवसांपासून तिच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीच्या बातम्यांमुळे जोरदार चर्चेत आहे. अलीकडे, अभिनेत्री एका हटक्या अंदाजात बघायला मिळाली आहे, आणि अनुष्का आणि विराट दुसऱ्यांदा आई- बाबा होणार अशी जोरदार चर्चा रंगली होती.