Download App

मोनिका राजळे, राम कदम यांना महाराष्ट्र विधीमंडळ समित्यांमध्ये स्थान, कोणाकोणाची लागली वर्णी ?

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली 25 फेब्रुवारी रोजी मंत्रिमंडाळाती बैठक पार पडली.

  • Written By: Last Updated:

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली 25 फेब्रुवारी रोजी मंत्रिमंडाळाती बैठक पार पडली. या बैठकीत राज्याच्या हितासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. याचबरोबर महाराष्ट्र विधीमंडळाच्या सन 2024-2025 या कार्यकाळासाठी विविध समित्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे.

यावेळी मुख्यमंत्र्यांसह, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) , कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) आणि भाजप विधीमंडळ मुख्य प्रतोप रणधीर सावरकर (Randhir Savarkar) यांच्या संमतीनं या समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपच्या नेतृत्वाखाली नव्या सदस्यांची नियुक्ती

पंचायत राज समितीच्या अध्यक्ष पदी रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे-पाटील यांची वर्णी लागली आहे तर सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्ष पदी भाजपचे नेते राहुल कुल यांची निवड करण्यात आली आहे. याचबरोबर आश्वासन समितीच्या अध्यक्ष पदावर रवी राणा, अनुसूचित जाती कल्याण समितीच्या अध्यक्ष पदी नारायण कुचे, अनुसूचित जमाती कल्याण समितीवर राजेश पाडवी, महिला हक्क व कल्याण समितीवर मोनिका राजळे, इतर मागासवर्गीय कल्याण समितीवर किसन कथोरे, मराठी भाषा समिती पदावर अतुल भातखळकर, विशेष हक्क समितीवर राम कदम, धर्मादाय खाजगी रुग्णालय तपास समितीवर श्रीमती नमिता मुंदडा आणि आमदार निवास व्यवस्था समितीच्या अध्यक्ष पदावर सचिन कल्याणशेट्टी यांची निवड करण्यात आली आहे.

भाजपच्या 11 समित्यांवर नव्या सदस्यांची नियुक्ती करण्यात असून आतापर्यंत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील समित्यांचे वाटप झाले नसल्याची देखील माहिती समोर आली आहे.

विविध समित्यांचे अध्यक्ष

महिला हक्क व कल्याण समिती: मोनिका राजळे

मराठी भाषा समिती: अतुल भातखळकर

विशेष हक्क समिती: राम कदम

धर्मादाय खाजगी रुग्णालय तपास समिती: नमिता मुंदडा

आमदार निवास व्यवस्था समिती: सचिन कल्याणशेट्टी

सार्वजनिक उपक्रम समिती: राहुल कुल

पंचायत राज समिती: संतोष दानवे-पाटील

आश्वासन समिती: रवी राणा

अनुसूचित जाती कल्याण समिती: नारायण कुचे

… म्हणून चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताला होतोय फायदा, पॅट कमिन्सचा धक्कादायक दावा

अनुसूचित जमाती कल्याण समिती: राजेश पाडवी

follow us