Nagarpalika Election-राज्यात नगरपालिका (Nagarpalika Election) निवडणुकीसाठी जोरदार वातावरण तापले आहे. प्रत्येक पक्षांनी स्थानिक वातावरण बघून कुणाशी युती, आघाडी करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. त्यात अनेक महत्त्वाच्या नगरपालिकांमध्ये महायुतीमध्येच थेट लढती होताना दिसत आहे. तर काही ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांची शिवसेना (Shivsena)एकाकी पडलीय.
रायगड, नाशिकमध्ये एकमेंकाच्या पायात पाय !
मुंबई महानगरपालिकेत काँग्रेने स्वतंत्र लढण्याची घोषणा केलीय. तर इकडे रायगडमधील उरणमध्ये महाविकास आघाडी आणि मनसेने एकत्र येऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर राज ठाकरे यांचा फोटोही पोस्टरमध्ये ठासून दिसतोय. तर भाजपनेही स्वतंत्र्य लढण्याची निर्णय घेत, उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना दोघेही एकाकी पडले आहेत. महाड नगरपालिकेत भाजप व राष्ट्रवादी एकत्र आली आहेत. तर शिवसेनेने वेगळी चूल मांडलीय. तर नाशिकमधील भगूर नगरपालिकेत भाजप व राष्ट्रवादी एकत्र आली आहे. तर शिवसेना एकाकी पडलीय. (Nagarpalika Election
Shivsena Eknath Shinde ncp)
रायगडमध्ये तीन ठिकाणी राष्ट्रवादी व ठाकरे सेनेची युती
रायगडमधील कर्जत, माथेरान, खोपोली या तीन नगरपालिकेमध्ये तर वेगळंच चित्र निर्माण झालंय. राष्ट्रवादी व उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र आलीय. त्यामुळे शिंदेंचे सेना स्वतंत्र लढणार आहेत. इकडे जळगावमधील नशिराबादमध्ये भाजप व शिवसेना एकत्र लढत आहे. तर राष्ट्रवादीने वेगळा पॅनल दिलाय.
सोलापूरमधील अकलुजमध्ये तिरंगी लढत
सोलापूरमधील अकलुज नगरपालिकेत तिरंगी लढत होणार आहे. अकलुज ग्रामपंचायत होती. येथे कायमच मोहिते कुटुंबाचे वर्चस्व राहिले. त्यांचे ते गावाच आहे. परंतु आता नगरपरिषद झाल्यानंतर पहिलीच निवडणूक होत आहे. येथे भाजप विरुद्ध दोन्ही राष्ट्रवादी असा तिरंगी लढत होणार आहे. येथे थेट सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार धैर्यशील मोहितेविरुद्ध राण उठवलं आहे. तर अजित पवार यांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढत आहे. अजितदादांनी येथे मोहिते पाटील यांचे विरोधक डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांना पक्षात घेतले आहे. त्यामुळे येथे तिरंगी लढत होत आहे.
कोपरगावमध्ये कोल्हे विरुद्ध काळे
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावमध्ये महायुतीमध्ये फूट पडली आहे. या नगरपालिकेत कोल्हे विरुद्ध काळे असा सामना रंगत आहे. भाजपचे विवेक कोल्हे व स्नेहलता कोल्हे यांनी स्थानिक आघाडी निर्माण केलीय. तर राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे हे स्वतंत्र लढत आहे.
