Download App

Vidhansabha Election : बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धवला गोळ्या घातल्या असत्या…; नारायण राणेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे हे हिदुत्व पणाला लावून मुख्यमंत्री झाले. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या.

  • Written By: Last Updated:

Narayan Rane : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabbha Election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका-टीप्पणी करत आहेत. आता भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे हे हिदुत्व पणाला लावून मुख्यमंत्री झाले. आज बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) असते तर त्यांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या, अशी टीका राणेंनी केला.

चॅम्पियन्स ट्रॉफीत ट्विस्ट! हायब्रीड मॉडेलच्या अफवा, पाकिस्तान बोर्डाचा मोठा खुलासा 

नारायण राणेंची निलेश राणे यांच्या प्रचारार्थ कुडाळमध्ये सभा झाली. यावेळी त्यांनी आपल्या आक्रमक शैलीत उद्धव ठाकरेंचा जोरदार समाचार घेतला. ते म्हणाले, कुडाळ तालुक्याची ही भाजपची भव्य बैठक असून निलेश राणे निवडून येणे आवश्यक आहे, हे मी सर्वांना सांगितलं. 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. तेव्हा निलेश राणे हे आमदार होतील, यामध्ये शंका नाही. सिंधुदुर्ग जिल्हा राज्याच्या राजकारणात फार झळकतोय. सर्वांचे आपल्याकडे लक्ष असून सर्व विरोधक टीका करत आहे. ही टीका वैयक्तिक नसून आपल्या विकासावर आहे, असं राणे म्हणाले.

शरद पवार आणि कंपनीने महाराष्ट्रावर अन्याय केला; कराडमध्ये अमित शाह कडाडले 

यावेळी राणेंनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली. ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंची भाषा सुसंस्कृत नाही, ते शिव्या देतात. ही भाषा बाळासाहेब ठाकरेंच्या घराण्याला शोभत नाही. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचे २५ पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाही, असंही राणे म्हणाले.

उद्धव ठाकरे हे हिदुत्व पणाला लावून मुख्यमंत्री झाले. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या अशी टीका राणेंनी केली. महाराष्ट्रात एखादा शिवसेनेचा कार्यकर्ता नावारुपला येत असेल तर त्याला सोडून लावण्याचा आणि कमजोर करण्याचं काम उद्धव ठाकरे करत आहे. उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात केवळ दोन दिवस मंत्रालयात काम केले आणि आता मला पुन्हा मुख्यमंत्री करा असे म्हणत आहेत, कोण देईल सत्ता त्यांना? अशी बोचरी टीकाही राणेंनी केली.

शरद पवारांवरही टीका-
चिपळूणमध्ये शरद पवारांनी आपल्या जाहीर सभेत राणेंच्या पुत्रांवर टीका केली होती. त्याला आता नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, पवारांनी राणेंच्या दोन्ही पुत्रांना संस्कार नाहीत, अशी टीका केली. मात्र, माझ्या घरात त्यांच्यावर संस्कार झालेत. मी देखील पवारांची कुंडली काढलेली आहे. गेली अनेक वर्ष आम्ही देखील राजकारणात आहोत. पवार साहेब तुम्ही चार वेळा मुख्यमंत्री होता. पण आरक्षण देऊ शकला नाही. आता  विकासावर आणि मराठा आरक्षणावर बोलू नका, असं राणे म्हणाले.

follow us