Narendra Modi In Satara : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर राज्यात महायुतीला (Mahayuti) जास्ती जास्त जागा जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) राज्यात जाहीर सभांचा धुराळा उडवला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साताऱ्यात (Satara Lok Sabha) महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. या जाहीर सभेत पुन्हा एकदा मोदींनी काँग्रेस (Congress) पक्षाला टार्गेट करत कॉग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
सभेत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेस पक्ष खोटं बोलण्यात मास्टर आहे, काँग्रेसने सैनिक परिवारांना 40 वर्षांपासून वन रँक वन पेंशन पासून वंचित ठेवून फक्त 500 कोटींचा झुनझुना दाखवला आहे. काँग्रेसने या देशात 60 वर्ष राज्य केला मात्र जम्मू काश्मीरमध्ये त्यांनी संविधान लागू केला नाही. मात्र आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवून भारताचा संविधान लागू केला असं या सभेत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले.
पुढे मोदी म्हणाले, देशभक्तांसाठी सातारा तीर्थक्षेत्रांपेक्षा कमी नाही. लोकसभा निवडणुकीसाठी उदयनराजेंना महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे यापूर्वी देखील साताऱ्यात भगवा फडकत होता आणि पुढे देखील भगवा साताऱ्यात भगवा फडकत राहणार असल्याचे मोदी म्हणाले. साताऱ्यात आल्यानंतर माझ्या जुन्या आठवणी ताजे होतात असं देखील मोदी म्हणाले.
युवराजाला आपसूक सत्ता मिळत नाही म्हणून निवडणूक आयोग हुकूमशाही ठरत नाही, मोदींचा घणाघात
साताऱ्याची भूमी शूर वीरांची भूमी आहे
2013 मध्ये जेव्हा मला भाजपने पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित केले होते तेव्हा मी रायगडच्या किल्ल्यावर गेलो होतो, मी कोणतेही काम सुरु करण्यापूर्वी शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी ध्यानस्थी होऊन बसलो होतो. मला शिवाजी महाराजांच्या समाधीपासून मला प्रेरणा आणि उर्जा मिळाली. यामुळेच मी गेल्या 10 वर्षांपासून आदर्श विचारांची जगण्याचा प्रयत्न केला.साताऱ्याची भूमी शूर वीरांची भूमी आहे. असं मोदी म्हणाले.