काँग्रेस उमेदवाराचा प्रताप! शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश

काँग्रेस उमेदवाराचा प्रताप! शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश

Akshay Kanti Bam withdraws nomination and join BJP : देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचे टप्पे सुरू आहेत. आता येत्या 7 मे रोजी तिसरा टप्पा होत आहे. तर, आणखी 4 टप्पे बाकी आहेत. परंतु, त्या अगोदरच काही ठिकाणी निवडणुकांचे निकाल लागले आहेत अशी परिस्थिती आहे. (Congress) मध्य प्रदेशमधील इंदौर लोकसभा मतदारसंघातून मोठी घटना समोर आली आहे. (Loksabha Election) येथे काँग्रेसचे अधिकृत असलेले उमेदवार अक्षय कांती बम यांनी अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे काँग्रेसला हा दुसरा असा मोठा धक्का आहे.

 

फक्त प्रवेश नाही थेट भाजप प्रवेश

लोकसभेच्या मैदानात आता काय घटना घडतील याचा काही नेम नाही. मध्य प्रदेशात काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती बम यांनी आपला उमेदवारी अर्ज अचानक मागे घेतला. तसंच, फक्त उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही, तर त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केल्याची आश्यर्यचकीत करणारी घटना घडली आहे. याबाबत भाजपचे वरिष्ठ नेते आणि मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी माहिती दिली आहे. तसंच, विजयवर्गीय यांनी अक्षय बम यांच्यासोबतचा एक सेल्फीही सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

विजयवर्गीय यांचं प्लॅनिंग?

इंदौर मतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी 25 एप्रिलपर्यंत अर्ज भरण्यात आले होते. त्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी 29 एप्रिल ही मुदत होती. त्यावर बंम यांनी अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेत काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. बम यांच्या या निर्णयामागे विजयवर्गीय यांचं प्लॅनिंग असल्याचं बोललं जातय. दरम्यान, इंदौर या मतदारसंघात येत्या 13 मे रोजी मतदान होत आहे. भाजपकडून शंकर लालवानी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

 

अधिकृत घोषणाक झालेली नाही

26 एप्रिल रोजी देशात लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाले. परंतु. त्या अगोदरच गुजरातमध्ये भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला. कारण, सुरत लोकसभा मतदारसंघातून पहिल्याच दिवशी काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभाणी यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्याने येथील समीकरण बदलून गेलं होतं. त्यानंतर येथील बीएसपीचे उमेदवार प्यारे लाल भारती यांनीही अखेरच्या दिवशी अर्ज मागे घेतला. तसंच, राहिलेल्या आठ उमेदवारांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने येथे भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांचा बिनविरोध विजय झाला. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून याची अधिकृत घोषणाक झालेली नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज