युवराजाला आपसूक सत्ता मिळत नाही म्हणून निवडणूक आयोग हुकूमशाही ठरत नाही, मोदींचा घणाघात

युवराजाला आपसूक सत्ता मिळत नाही म्हणून निवडणूक आयोग हुकूमशाही ठरत नाही, मोदींचा घणाघात

PM Modi Interview : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी एका मुलाखतीमध्ये (Interview) अनेक प्रश्नांची उत्तर देत काँग्रेस (Congress) खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

मोदींनी राहुल गांधी यांच्यावर टीका करत, युवराजाला आपसूक सत्ता मिळत नाही म्हणून निवडणूक आयोग हुकूमशाही ठरत नाही. युवराजाला निवडणूक लढवावी लागत आहे, भारतातील जनता त्यांच्याकडे आकृष्ट होत नाही, म्हणून भारताच्या लोकशाहीचा दर्जा हीन ठरत नाही. असं म्हणाले आहे.

तर लोकसभेसाठी आतापर्यंत दोन टप्प्यात झालेल्या मतदानानंतर भाजप 400 पार करणार का असं प्रश्न विचारण्यात आल्यानंतर मोदी म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर मी आतपर्यंत 70 हून अधिक रॅली आणि रोड शो केले आहेत. मी जिथे गेलो आहे तिथे लोकांनी मला भरपूर प्रेम दिला आहे, लोकांच्या या पाठिंब्यामुळेच आम्ही 400 चा टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर आहोत असं मोदी म्हणाले.  गेल्या 10 वर्षात आम्ही आम्ही काय देऊ शकतो हे जनतेने पाहिले आहे आणि आमचा विश्वास आहे की जनतेला चांगला उद्या हवा आहे आणि त्यांना माहित आहे की भाजपला मत म्हणजे विकासाला मत असं देखील यावेळी मोदी म्हणाले.

तुम्ही संविधान बदलणार का ? या प्रश्नावर उत्तर देत मोदी म्हणाले, देशात आतापर्यंत सर्वाधिक वेळा ज्यांनी संविधान बदलले आहे ते लोक आज आमच्यावर आरोप करत आहे. तुम्ही मुख्यमंत्री झाल्यापासून माझा ट्रॅक रेकॉर्ड पहा मी असे काही केले आहे का ? ते पहा तुम्हाला या प्रश्नाचा उत्तर मिळेल असं मोदी म्हणाले.

तर राहुल गांधी आणि काँग्रेसवर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देत मोदी म्हणाले, काँग्रेसला 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून देण्यासाठी काहीतरी चमत्कार घडेल असा विश्वास आहे कारण आता काँग्रेसच्या दिग्गज आणि महत्त्वाच्या नेत्यांनीही या निवडणुकीत पराभव स्वीकारला आहे. यामुळे राहुल गांधी आमच्यावर खोटे आरोप करत असल्याची टीका मोदींनी केली.

देशात समान नागरी कायदा लागू होणार का? या प्रश्नावर उत्तर देताना मोदी म्हणाले, आमच्या पक्षासाठी समान नागरी कायदा एक प्रमुख मुद्दा असून देशात भाजपशासित राज्ये हा कायदा लागू करण्याची तयारी करत आहे. समान नागरी कायदा लागू करणारा देशात उत्तराखंड हे पहिले राज्य ठरले आहे.

दादा लवकर बरे व्हा… उत्कर्षा  रुपवते संघर्षयोद्धा मनोज जरांगेंच्या भेटीस

देशात वेगवेगळ्या समाजांसाठी वेगवेगळे कायदे असणे हे सामाजिक आरोग्यासाठी हानिकारक असून देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी जे जे करावे लागेल ते आम्ही करू असं मोदी म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज