Download App

Video : सरडाच विसरला आपला रंग… शरद पवारांच्या पक्षाकडून थेट अजितदादांची सरड्याशी तुलना

  • Written By: Last Updated:

Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar on Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) व शरद पवार गट (Sharad Pawar) एकमेंकावर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाही. आता तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्ह निवडणूक आयोगाने दिले आहे. त्यामुळे शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार (Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar) असे नाव मिळाले आहे. पक्ष व चिन्ह गेल्याने शरद पवार गट अजित पवारांवर आता तुटून पडत आहे. अशीच आलेली संधी शरद पवार गटाने मात्र सोडलेले नाही. कोल्हापूर दौऱ्यातील एका कार्यक्रमात अजित पवार हे भाषण करत असताना ते महायुती एेवजी महाविकास आघाडी म्हटले. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाने अजित पवारांची तुलना थेट सरड्याशी केली आहे.

प्रिया दत्त यांच्याशी चर्चा केल्यानंतर बाबा सिद्दिकांचा राष्ट्रवादीत प्रवेश, अजितदादांच्या विधानाने खळबळ

आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीनुसार स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी सरडा आपला रंग बदलतो पण सारखा रंग बदलताना आपण आत्ता नक्की कुठे आहोत ह्याचं भान मात्र त्याला राहत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार यांच्या एक्सवरून म्हटले आहे. अजित पवारांच्या तोंडी महाविकास आघाडीचे नाव येणे हा त्यातलाच प्रकार आहे. उपमुख्यमंत्री जरा सांभाळून, घार घिरट्या घालतेच आहे, असा निशाणा अजितदादांवर एक्सवरून शरद पवार गटाने साधला आहे.

‘आम्हाला कढीपत्ता समजल्या जायचं’, राष्ट्रवादीत प्रवेश करताच सिद्दीकींचा पहिला वार

शरद पवारांच्या पक्षाने अजित पवार यांचे अडखळलेल्या भाषणाचा व्हिडिओच पक्षाच्या एक्स अकाउंटवर शेअर केला आहे. त्यात अजित पवार हे दोनदा अडखळत महायुती एेवजी महाविकास आघाडीचे असे म्हणत आहे. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातील पाणी नव्याने वाहावे, असे गाणेही व्हिडिओसाठी वापरले आहे. सतरा सेकंदाच्या रील फॉर्मटमध्ये सरडाच विसरला आपला रंग असे लिहिलेले आहे. यावर अद्याप तरी अजित पवार यांच्याकडून कोणतेही उत्तर आलेले नाही.

follow us