Download App

नवनीत राणांच्या सभेत मोठा राडा! खुर्च्या फेकल्या, जोरदार घोषणाबाजी अन् मारहाण

  • Written By: Last Updated:

Navneet Rana Rally Rada At Khallar : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. दरम्यान अमरावती जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आलीय. अमरावतीच्या दर्यापूर विधानसभा मतदारसंघामधील खल्लार गावात माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या प्रचार सभेत मोठा राडा झालाय. या राड्यादरम्यान माजी खासदार नवनीत राणा यांच्या अंगावर खुर्च्या फेकण्याचा देखील प्रयत्न करण्यात आलाय. या घटनेत नवनीत राणा थोडक्यात बचावल्या आहेत. या सगळ्या घटनेनंतर खल्लार पोलीस स्टेशनमध्ये नवनीत राणा यांनी केली तक्रार दाखल (Assembly Election 2024) केलीय.

नवनीत राणा युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदीले यांच्या प्रचारार्थ खल्लारमध्ये होत्या. त्यावेळी ही घटना घडलेली आहे. वनीत राणा दर्यापूर मतदारसंघामध्ये शनिवारी प्रचारासाठी होत्या. युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदीले यांच्या प्रचारार्थ खल्लारमध्ये मोठ्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु सभेत मोठा गोंधळ झालाय. सभेदरम्यान दोन गटाचे कार्यकर्ते आक्रमक होत भिडले. हे प्रकरण पोलिसांनी तातडीने शांत केलं.

Rahuri Assembly Constituency: प्रचारात अडथळा आणला; तनपुरे समर्थकांवर आरोप करत कर्डिलेंची पोलिसांकडे धाव

परंतु या घटनेमध्ये अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळतेय. सभेदरम्यान आक्रमक जमावाने एकमेकांना खुर्च्या फेकून मारल्या. घटनास्थळी तोडफोड देखील करण्यात आली होती. दोन्ही गटात जोरदार हाणामारी अन् हाणामारी झाल्याचं समोर आलंय. सध्या खल्लार गावामध्ये तणावपूर्ण शांततेचं वातावरण असल्याची माहिती मिळतेय. घडलेल्या प्रकारानंतर नवनीत राणा यांनी पोलिसांत धाव घेतली. घटनेच्या व्हिडिओ दाखवत याप्रकरणी पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आलाय.

तेव्हा मी उद्धव ठाकरेंच्या जागी असतो तर …, नाशिकमध्ये राज ठाकरे स्पष्टच बोलले

अमरावतीमधील दर्यापूर मतदारसंघात युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदिले आहे. माजी खासदार नवनीत राणा यांनी जाहीर पाठिंबा दिलाय. खल्लार गावामध्ये माजी खासदार नवनीत राणांच्या प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी सभेत मोठा गोंधळ झाला. या घटनेमध्ये नवनीत राणा थोडक्यात बचावल्याचं समोर आलंय. या राड्यानंतर रॅलीतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न निर्माण झालेत. दर्यापूरमधील राजकीय तणाव सध्या वाढल्याचं दिसतंय.

 

follow us