Jayant Patil : आगामी निवडणुकीत विरोधकांच्या भपकेबाजीला घाबरु नका, सत्ता असते तेव्हा फुकवटा असतो, अशी टोलेबाजी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने (Ncp) अहमदनगरमधील शिर्डीत राज्यस्तरीय शिबीराचे आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरात बोलताना जयंत पाटील यांनी विविध मुद्द्यांवरुन सरकारच्या धोरणांवर टोलेबाजी केलीयं.
मोठा दिलासा! नोव्हेंबर 2005 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय
जयंत पाटील म्हणाले, पुढील काळात अनेक गोष्टी होणार आहेत. प्रचंड भपकेबाजपणा समोरच्या बाजूला दिसणार आहे. त्यांचं सरकार असल्यामुळे सरकारचं व्यासपीठ हे पक्षाचं व्यासपीठ असं समजून ते देशात राज्यात वागताहेत पण त्यांच्या भपकेबाजीला घाबरु नका…कारण सत्ता असते तेव्हा असा फुकवटा असतो, अशी टीका जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे.
Sanjay Raut : महानंदच्या 27 एकरवर गुजरात लॉबीचा डोळा; राऊतांचा सरकारवर हल्ला
तसेच हा फुकवटा त्यांच्या विजयासाठी नाहीतर कोण निवडून येणार आहे त्याचा अंदाज घेण्यासाठी असतो, त्यामुळे आपण ठामपणे निर्णय घेऊन काम करणं सुरु केलं पाहिजे. सध्या दडपशाहीचं वातावरण असून संसदरत्नांवर कारवाई झाली आहे. संसदेच्या सुरक्षेप्रकरणी आवाज उठवल्याने देशातले 143 खासदरांना सत्ताधाऱ्यांनी घरी पाठवलं आहे.
‘महानंद’ला वाचवायचं सोडून ‘अमूल’ला मोकळे रान, किसान सभेची राज्य सरकारवर टीका
सुरक्षेच्या प्रश्नावरुन चर्चेची मागणी केली हा त्यांचा गुन्हा काय? चर्चा होऊ द्यायचीच नाही असं चालवलं जात आहे. देशात कधीच अशी निलंबनाची कारवाई झाली नव्हती पण आता निलंबन करायचं आणि सरकार चालवायचं ही नवी पद्धत सुरु झाली असल्याचंही टीकास्त्र जयंत पाटील यांनी मोदी सरकारवर सोडलं आहे.
Truck Driver Strike चा असाही परिणाम; पेट्रोल अभावी झोमॅटो बॉयची थेट घोड्याला टाच
राम सर्वांचाच आहे पण अडकू नका…
राम सर्वांचाच आहे त्यामध्ये अडकू नका. राम आपला नाही असं नाहीये. आपणही रामभक्त आहोत पण त्याच्यात अडकू नका. सरकारमध्ये बसलेल्या लोकांसमोर लोकांच्या उणीवा काय आहेत त्या मांडण्याचं काम करण्याचं आवाहन जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.
दरम्यान, देशावर 205 लाख कोटींचं कर्ज असून एवढं कर्ज आपल्या डोक्यावर असेल तर आपल्या देशाती अवस्था बांग्लादेश आणि श्रीलंकेसारखी होणार असल्याचंही भाकीत जयंत पाटलांनी केली आहे. तसेच देशात कुटुंब बचतीमध्ये मागील 10 वर्षांच सर्वांत निच्चांकी वर्ष सध्याचं असून अर्थव्यवस्थेवर सरकार बोलत नाही, असंही ते म्हणाले आहेत.