Download App

मटण खाऊन वारीत गेल्याने मतं मिळत नाही; आव्हाडांचा बीआरएसवर निशाणा

Jitendra Awhad On BRS :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह महाराष्ट्रात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. या सगळ्यावर आव्हाड यांनी भाष्य केले.

मला वाटत नाही की महाराष्ट्रातील जनता एवढी मुर्ख आहे. बीआरएस ज्या उद्देशाने महाराष्ट्रात येत आहे, तो उद्देश आम्ही आधीच स्पष्ट केला आहे. तेलंगणामध्ये बीआरएस हारत आहे. त्यामुळे इथे येऊन इथल्या तीन पक्षांवर दबाव निर्माण करायचा, असे त्यांचे काम सुरु आहे. महाराष्ट्रामध्ये अशा 400 गाड्या आणून व सोन्याचे छपरे लावून काहीही फरक पडत नाही, असे म्हणत त्यांनी बीआरएसला फटकारले. तसेच  मटण खाल्लं, वारीत गेले असं करुन मते मिळत नाही.  मतदार एवढा मुर्ख आहे का? आजे ते मटण खाणार उद्या वारीला जाऊन माळ घालणार, मतदार एवढा मुर्ख नाही, असे म्हणत त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्यावर टीका केली.

बीआरएसची धडकी! ताफा पंढरपुरात येण्याआधीच नाना पटोले म्हणाले, ही तर…

यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर देखील निशाणा साधला. बावनकुळेंनी ओबीसीच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीला सुनावले होते.  त्यावर आव्हाड म्हणाले, तुम्ही ओबीसी असून तुमचं आयत्यावेळी तिकीट कापलं. इथं आमच्यासारखे ओबीसी नेते घरी बसतात. आमच्या घरी एबी फॉर्म येतो. आम्हाला फॉर्म आणायला जावं पण लागत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसीचे प्रेम बघायचे असेल तर सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे जितेंद्र आव्हाड होय, असे ते म्हणाले.

संभाजीराजेंच्या हत्येचं कारस्थान हिंदुंनीच रचलं, प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ…

तसेच तुम्हाला साधं तिकीट दिलं नाही. एका रात्रीत सांगितलं चला घरी बसा, असे म्हणत त्यांनी बावनकुळेंना टोला लगावला.  यावेळी त्यांना राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबत देखील विचारण्यात आले. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आव्हाडांना प्रदेशाध्यक्ष करावे असे म्हटले होते. त्यावर आव्हाडांनी माझी पंतप्रधान होण्याची इच्छा आहे, असे मिश्किल वक्तव्य केले.

Tags

follow us