Download App

अजितदादा व सुनेत्रावहिनींबाबत बोलाल तर जशाच तसे उत्तर; सुनील तटकरेंचा थेट इशारा

  • Written By: Last Updated:

Ncp Leader Sunil Tatkare On Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. माझ्या नवऱ्याने भाषणे केलेली तुम्हाला चालतील का? नवऱ्याला संसदेच्या परिसरात परवानगी नसते. कॅन्टिनमध्ये बसावे लागते, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्याला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे ( Sunil Tatkare) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सुप्रिया सुळे यांनी नैराश्य असले तरी असे वक्तव्य करणे थांबवावे नाही तर यापुढे अशीच वक्तव्य केली तर मात्र त्याला जशासतसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही सुनील तटकरे यांनी दिलाय.


कारखान्यावर षडयंत्र रचले का ? राजेश टोपेंकडून सरकारला प्रत्युत्तर देत थेट आव्हानही

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा विचार सांगणार्‍यांनी पती-पत्नी यांच्या नात्यात अशा स्वरुपाचे आकसपणाचे भाष्य करणे हे राजकीय संस्कृतीला अभिप्रेत नाही. आदरणीय सदानंद सुळे यांच्याबद्दल आम्हाला आदर होता, आहे आणि उद्याही असेल पण कुण्या महिला खासदारांचे पती संसदेच्या प्रेक्षक गॅलरीत पर्स वागवत फिरतात असे चित्र अद्यापतरी पाहिले नाही, असा टोलाही तटकरे यांनी लगावला आहे. सुनेत्राताई यांच्या संसदेतील भवितव्याबाबत सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य हे असंस्कृत आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचारात बसणारे नाही, असे तटकरे म्हणाले.

शिवाजीराव आढळराव पाटील CM शिंदेंची साथ सोडणार; तब्बल 20 वर्षांनी ‘राष्ट्रवादीत’ करणार घरवापसी

आजपर्यंत अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले योगदान महाराष्ट्राला ठाऊक आहे. १९९९ पासून अजित पवार वगळता राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती काय असती हे नव्याने सांगायला नको, असे सुनिल तटकरे म्हणाले. अजित पवार यांची सभा व्हावी हे राष्ट्रवादीच्या प्रत्येक उमेदवाराचे ध्येय असते. त्यामुळे अजित पवार हे स्वतः उमेदवार असल्याच्या भावनेतून राष्ट्रवादीच्या प्रत्येक उमेदवाराचा प्रचार करतात अशीच भावना बारामतीकरांसमोर आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात केली. यात गैर काहीच नाही पण खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र सुनेत्राताई यांच्या क्षमतेबाबत संशय व्यक्त करत संकोचितपणाचे दर्शन घडवले आहे असा जोरदार टोला सुनील तटकरे यांनी लगावला.

सुनेत्रा पवार या उत्तम वक्त्या आहेतच. शिवाय त्यांचे तिन्ही भाषेवर प्रभुत्व आहे. त्याचबरोबर स्थानिक पातळीवर विविध सामाजिक संस्था व संघटनांच्या माध्यमातून लोकोपयोगी काम त्यांनी उभारलेले आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या संसदेतील भवितव्याबाबत सुप्रिया सुळे यांनी नैराश्य असले तरी असे वक्तव्य करणे थांबवावे नाही तर यापुढे अशीच वक्तव्य केली तर मात्र त्याला जशासतसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही सुनील तटकरे यांनी दिलाय.

follow us