Download App

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन? ‘मी असं बोललोच नाही’; शरद पवारांचा घुमजाव…

प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या विधानावरुन शरद पवारांनी घुमजाव घेतला. मी असं बोललोच नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय.

Sharad Pawar News : आगामी निवडणुकांमध्ये (Election) प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये (Congress) विलीन होणार असल्याचा दावा शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल एका मुलाखतीदरम्यान केला. त्यानंतर राज्यभरात अनेक चर्चांना तोंड फुटलं होतं. राजकीय वर्तुळात अनेकांनी पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिल्या तर विरोधकांकडून सडकून टीकादेखील करण्यात आली होती. त्यावर बोलताना शरद पवार यांनी आज घुमजाव घेतल्याचं दिसून आलं. मी असं बोललोच नसल्याचं शरद पवार यांनी आज स्पष्ट केलंय. पुण्यात ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

भारतातील निवडणुकीत अमेरिकेचा हस्तक्षेपाचा प्रयत्न; रशियाचा खळबळजनक दावा

शरद पवार म्हणाले, काँग्रेसच्या विचारधारेचा राष्ट्रवादी पक्ष असून आम्ही स्थापनेपासून काम करीत आहोत. अनेक वर्षांचा आम्हाला अनुभव असून अधिक एकत्रितपणे काम करण्याची आमची इच्छा वाढली तर आश्चर्य वाटायला नको, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. आम्ही कधीच भाजपासोबत जाणार नाही. गांधी-नेहरुंचा विचार आम्ही कधीच सोडणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाबाबत मी काहीच बोललो नाही. उद्धव ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष असून त्यांचं स्वतंत्र अस्तित्व असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलंय.

उत्कर्षा रुपवतेंच्या प्रचारासाठी सुजात आंबेडकर मैदानात, आज कोपरगावात जाहीर सभा

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन?
राष्ट्रवादी आणि काँग्रेस 2001 पासून एकत्रितपणे काम करीत आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात एकत्रित काम करीत होते. अनेक मतदारसंघात जिथं काँग्रेसचा उमेदवार तिथं राष्ट्रवादीचाही उमेदवार दिला. काँग्रेसनेही उमेदवार दिला. एकत्रित काम करण्याची गरज असल्याने आम्ही काम करीत असल्याचंही शरद पवार म्हणाले आहेत.

पवारांच्या विधानाने चर्चांना उधाण :
शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर राजकारणात वेगवेगळा सूर आवळण्यात आला. पवारांच्या वक्तव्यावर महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनीही भाष्य केलं. देशात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत, या प्रादेशिक पक्षांना काँग्रेस हाच पर्याय असून प्रादेशिक पक्ष भाजपमुळे ग्रासलेले आहेत, त्यामुळे सर्वच पक्षांना काँग्रेस हाच पर्याय असल्याचं वाटत आहे, त्याच आधारावर शरद पवार यांनी वक्तव्य केलं असल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे. तर बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे म्हणाल्या, देशात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. अनेक म्हणजे त्यामध्ये कोणताही पक्ष असू शकतो, सगळे पक्ष आणि अनेक पक्ष यामध्ये अंतर आहे, असं सूचक विधान सुप्रिया सुळे यांनी केलं.

follow us