Download App

सावळा गोंधळ करुन योजना जाहीर; जयंत पाटलांची अजितदादांचं नाव घेत टीका

सावळा गोंधळ करुन योजना जाहीर केल्या असल्याची सडकून टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलीयं. ते बीडमध्ये बोलत होते.

Jayant Patil News : सावळा गोंधळ करुन योजना जाहीर केल्या असल्याची सडकून टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil News) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांचं नाव घेत केलीयं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्यावतीने राज्यभरात शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आज बीडमध्ये पार पडली. यावेळी जयंत पाटील बोलत होते.

बारामतीच्या रिंगणात जय पवार? अजितदादा म्हणाले, ७-८ वेळा लढलो, आता इंटरेस्ट नाही

जयंत पाटील म्हणाले, अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना म्हणतात की, मी आता न बघता कशावरही सही करणार नाही, म्हणजे आधी न बघता सह्या केलेल्या होत्या. त्या सर्व योजना जाहीर झाल्या त्या योजना न बघता सह्या केल्या आहेत. सावळा गोंधळ करुन योजना जाहीर केल्या आहेत. या योजना फक्त दोन महिन्यांसाठी आहेत. आमच्या चिन्हासमोर बटन दाबा नाही तर आम्ही योजना बंद करु पण हे लोकं यांच्या खिशातून पैसे देत नाहीत महिलांनो घाबरु नका योजना बंद होत नाहीत, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

29 तारखेचा अल्टिमेटम दिलायं, नाही तर निर्णय घेणार; मनोज जरांगेंचा इशारा

तसेच राज्याच्या विकासासाठीचा निधी सावळ्या गोंधळात जाहीर केलेल्या योजनांकडे वळवण्यात येत आहे. जिल्ह्याचा विकासाचा निधी, दलित विकासाचा निधी, आदिवासी विकासाचा निधी या योजनेकडे द्यायचं काम राज्य सरकाकडून सुरु आहे. सरकारकडून कोणताही विचार न करता योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे राज्याची अर्थिक घडी विस्कटण्याचं काम सत्ताधाऱ्यांकडून होत असून उद्या आपलं सरकार येणार या योजनांना योग्य दिशा देण्याचं काम महाविकास आघाडीचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही, असं जयंत पाटलांनी सांगितलंय.

अर्शद नदीम करणार पाकिस्तान क्रिकेट संघात एन्ट्री, बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत दिसणार ॲक्शनमध्ये?

राज्य सरकारची दिशा भरकटलीयं…
अर्थमंत्री अजित पवार यांनी अनेक योजनांच्या घोषणा केल्या आहेत. या योजनांच्या जाहिरातीसाठी सरकारकडून 280 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. वर्तमानपत्राच्या प्रत्येक पानावर योजनांची माहिती आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे फोटो छापून येत आहेत. हे योजनादूत सरकार तुमच्या घरापर्यंत येऊन योजना सांगणार आहेत. त्यासाठी अनेक कोटी रुपये खर्च करीत असून पैशांचा अपव्यय होत आहे. हे फडणवीस आणि शिंदेंकडून अपेक्षित नसल्याचं जयंत पाटलांनी म्हटलंय.

follow us