Download App

‘अदृश्य शक्तीला चीत केलं नाही तर नाव सांगणार नाही’; सुप्रिया सुळेंचं खुलं चॅलेंज

Supriya Sule On BJP : अदृश्य शक्तीला चीत केलं नाही तर सुप्रिया सुळे(Supriya Sule) नाव सांगणार नाही, असं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपविरोधात दंड थोपटले आहे. आगामी निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसल्याचं दिसून येत आहे. अशातच आता सुप्रिया सुळे यांनी आगामी निवडणुकीत अदृश्य शक्तीला चीत करणार असल्याचं खुलं चॅलेंजच दिलं आहे.

Maratha Reservation : ‘त्या नोंदीही शिंदे समितीने जाहीर कराव्या; बबनराव तायवाडेंची मागणी काय?

सुप्रिया सुळे म्हणाल्या, राष्ट्रवादीच्या चिन्हांची लढाई काय होईल, अदृश्य शक्ती काय करेल आम्हाला माहित नाही, पण आगामी निवडणुकीत अदृश्य शक्तीला चीत केलं नाहीतर सुप्रिया सुळे नाव सांगणार नसल्याचं सुळेंनी स्पष्ट केलं आहे.

मॅथ्यू रोडचे नाव बदलणार, मंत्री लोढा राजकारण करत असल्याचा स्थानिकांचा आरोप

लहानपणापासूनच लाल दिवा बघते…
सुरुवातीला शरद पवारांची मुलगी म्हणून राजकारणात आले. आमच्या घरातले सगळे लोक माझ्या प्रचाराला यायचे अजित पवार ही यायचे. आपले आजोबा आणि आई लढत आहेत. माझ्याकडे सत्तेचा पर्याय होता. सत्तेत गेले असते तर आज लाल दिवा घेऊन आले असते. सत्ता मी लहानपणापासून लाल दिवा बघते आहे. माझ्या वडिलांनी संघर्ष केला त्यांना सोडून सत्तेत जाणे मला पटले नाही, असंही सुळे म्हणाल्या आहेत.

नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचे दाऊद कनेक्शन?

2013/14 साली लोक सत्ता असताना आपल्याला नाकारत होते. तेव्हा भाजपने आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. जोपर्यंत सुषमा स्वराज, अरुण जेटली होते तोपर्यंत भाजप होता. आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आज ना खाऊंगा ना खाने दुंगाचे काय झालं? आरोप सिद्ध करा नाहीतर आमची हात जोडून माफी मागा, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

‘कोचिंग क्लासेस नव्हे तर पालकांना दोषी ठरवावं’: ‘कोटा’प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

दिल्लीच्या मंत्र्यांना काय करावं लागतं हे मी जवळून बघते आहे. दिल्लीच्या अदृश्य शक्तीला चीत करणार असून बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला पक्ष त्यांनी त्यांच्या मुलाला दिला तो पक्ष कुणी घेतला त्यांचे बघा पुढे काय होतंय ते. ओरिजिनल भाजप पक्ष मर्यादा पुरूषोत्तम प्रभुजी राम असे म्हणायचा आता म्हणतात का ते? असा सवालही सुळे यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

Tags

follow us