Download App

हो…मी तुषार खरातांना ओळखते, सुप्रिया सुळेंनी केलं CM फडणवीसांच्या आरोपांचं खंडन

Supriya Sule On CM Devendra Fadanavis Allegations : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते हे जयकुमार गोरे यांना कट रचून अडकवण्याचा प्रयत्नात होते. हा आरोपी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. सभागृहामध्ये बोलताना फडणवीसांनी (Supriya Sule) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि रोहित पवार (Rohit Pawar) यांची देखील नावं घेतली आहेत. पत्रकार तुषार खरात यांच्यासोबत देखील त्यांचे कॉल झाल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. यावर आता खासदार सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

सुप्रिया सुळे यांनी पत्रकार तुषार खरात यांना ओळखत असल्याचं स्पष्ट केलंय. परंतु खरांताशिवाय ज्या लोकांची नावं देवेंद्र फडणवीस यांनी घेतली, त्यांना मी ओळखत नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. एका सशक्त लोकशाहीमध्ये पत्रकाराला बोलायला काय प्रॉब्लेम आहे. असा देखील सवाल खासदार सुळेंनी केलाय. माझी भाषणं, सोशल मिडिया अकाउंट्स पारदर्शक आहेत, ते तुम्ही पाहात आहात. मी कधीही कोणत्याही व्यक्तीबद्दल वैयक्तिक टिप्पणी केलेली नाही. यापुढेही करणार नाही. कारण माझ्यावर आई-वडिलांनी आणि यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत, असं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

‘…तर कारवाई होणार’ नागपुरात सोशल मीडियावर पोलिसांची नजर, रिल्स बनवणाऱ्यांना सक्त ताकीद

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझं आयुष्य अन् मोबाईल पूर्णपणे पारदर्शक आहे. मी सातत्याने पत्रकारांच्या संपर्कात असते. येथे जेवढे माईक घेवून आहेत, त्यांचे मला नियमित फोन आणि मेसेज येतात. केलेली बातमी आणि व्हिडिओ तुम्ही सगळे पाठवतात, असं देखील सुप्रिया सुळेंनी पत्रकारांना उद्देशून म्हटलंय. तुषार खरातांना मी नक्कीच मी ओळखते. त्यांचं लोकप्रिय यूट्यूब चॅनल असून त्यांनी माझी लोकसभा अन् विधानसभा निवडणुकीवेळी मुलाखत देखील घेतली होती.

उद्धव ठाकरेंना दुसरा धक्का! अहिल्यानगरमधील ‘हा’ दिग्गज नेता हाती घेणार धनुष्यबाण; पक्षप्रवेश कन्फर्म

देवेंद्र फडणवीस यांनी नाव घेतल्याचं मला आश्चर्य वाटलं, असं देखील त्यांनी म्हटलंय. तर माझा या सगळ्याशी काय संबंध? असा देखील सवाल सुळेंनी केलाय. मी पार्लमेंटमध्ये व्यस्त आहे, हा विषय कुठून आला? 1 कोटी रुपयांच्या कॅशबद्दल मी बोलले होते. मी हा विषय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्यापर्यंत नेणार असल्याचं म्हटलं होतं. 1 कोटी रुपये कुठल्या अकाउंटमधून काढले? असं देखील सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी कोणते आरोप केले होते?

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील महिला, तुषार खरात आणि तिसरा अनिल सुभेदार यांनी मिळून भाजपचे नेते जयकुमार गोरे यांच्याविरोधात कट रचला होता. या सगळ्यांशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक संपर्कात असल्याचं दिसून आलंय. हे पुराव्यानिशी सांगत आहे. सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे आणि तुषार खरात यांचे देखील फोन आहेत.

 

follow us