Download App

2014 च्या आधी कृषीमंत्री महाराष्ट्रातलेच पण..,; मोदींचा शरद पवारांवर घणाघात

Pm Narendra Modi : 2014 च्या आधी महाराष्ट्रातलेच कृषीमंमत्री होते शेतकऱ्यांना पॅकेज घोषित व्हायचं पण मिळत नव्हतं, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर घणाघात केला आहे. दरम्यान, विविध विकासकामांच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यवतमाळमध्ये आयोजित सभेत बोलताना पंतप्रधान मोदी शरद पवार यांचं नाव न घेता हल्लाबोल चढवला आहे.

राज्यात पहिल्यांदाच आंदोलनकर्त्यांची एसआयटी चौकशी; जरांगेंच्या चौकशीवरुन पटोलेंनी घेरलं

पंतप्रधान मोदी म्हणाले, केंद्रात जेव्हा युपीए सरकार होतं तेव्हा तेव्हाची स्थिती काय होती तेव्हा कृषीमंत्रीही महाराष्ट्राचेच होते. त्यावेळी दिल्ली ते विदर्भातील शेतकऱ्यांच्या नावावर पॅकेज जाहीर व्हायचं पण मध्येच लुटलं जायचं. गाव, गरीब, शेतकरी, आदिवसींना काही मिळत नव्हतं. आज मी एक बटन दाबलं आणि पीएम किसान योजनेचे 21 हजार करोड रुपये शेतकऱ्यांच्या खातेवर पोहोचले ही तर मोदींची गॅरंटी असल्याचं म्हटलं आहे.

PM मोदींचा एक दिवसाचा दौरा, खर्च मात्र 12.75 कोटी; पैशांच्या उधळपट्टीवर काँग्रेसचा संताप

तसेच काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा दिल्लीतून एक रुपया निघायचा तर 15 पैसे पोहोचत होते. जर काँग्रेसची सरकार असते तर शेतकऱ्यांना 21 हजार करोड मिळाले आहेत, त्यातील 18 हजार करोड मध्येच लुटले असते पण आता भाजपाच गरीबांचा संपूर्ण पैसा गरीबांना मिळत आहेत, अशी सडकून टीकाही पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर केली आहे.

‘जरांगेंची SIT चौकशी ‘चिवट’पणे करा’; ‘चिवट’ शब्दावर जोर देत उद्धव ठाकरेंची मागणी…

देशात पंतप्रधान मोदी यांची गॅरंटी आहे म्हणूनच तर देशातील प्रत्येक लाभार्थ्यााला पैसे बॅंकेत मिळत आहेत. आता तर राज्यातील शेतकऱ्यांकडे डबल इंजिनची डबल गॅरंटी आहे. ही मदत सोडून आता महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना 3 हजार 800 कोटी रुपये वेगळे ट्रान्सफर झाले आहेत. पीएम किसान योजनेतून 12 हजार प्रत्येक वर्षी मिळत आहेत. आत्तापर्यंत 11 हजार करोड शेतऱ्यांच्या खात्यावर 3 लाख करोड रुपये जमा झालेले आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना 30 हजार करोड आणि यवतमाळच्या शेतकऱ्यांना 900 करोड रुपये मिळाले असल्याचंही पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

follow us