Download App

संविधानाविरोधात भाजप-संघ काम करतोय; प्रकाश आंबेडकरांची बोचरी टीका

  • Written By: Last Updated:

Prakash Ambedkar : सातत्याने भाजप (BJP)आणि आरएसएसवर (RSS) बोचरी टीका करणारे वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीकास्त्र डागलं. संतांनी व्यक्ती आणि सामूहिक स्वातंत्र्याची जी मांडणी केलेली आहे. त्याच संतांच्या विचारावर आधारित जे संविधान आहे, त्या विरोधात भाजप आणि आरएसएस काम करत आहे, असा गंभीर आरोप आंबेडकरांनी केला.

संघर्ष टोकाला ! ‘दादागिरी’चा उद्योग करणाऱ्या ‘मलिदा’ गँगेनेही लक्षात ठेवावे; रोहित पवारांचा थेट इशारा 

आज आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलतांना आंबेडकरांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी भाजपवरही जोरदार टीका केली.ते म्हणाले की, आम्ही हिंदू धर्माचे प्रतिनिधी आहोत, असे भाजप आणि आरएसएस दोघेही सांगतात. देशातील बहुसंख्य वर्ग पूर्णपणे हिंदू आहे. मग तरीही धार्मिक राजकारण का? असा सवाल त्यांनी केला. गेल्या दहा वर्षांत झालेल्या कारवायातून हे इतिहासातील भांडण असल्याचं दिसतं. संतांनी जी मांडणी केली, ती व्यक्ती व सामूहिक स्वातंत्र्याची आहे. वैदिक धर्मातील जी सामाजिक मांडणी आहे, ती व्यक्ती स्वातंत्र्य आणि सहजीवन नाकारणारी आहे. यातून संतांच्या विचारावर आधारित जे संविधान हे त्याविरोधात भाजप व आएसएस दिसते, अशी टीका त्यांनी केली.

‘काका-पुतण्याचं नातं कॉंग्रेसला धार्जीण, काहींना व्यक्तिगत संबंधही…’, जयंत पाटलांनी अजितदादांना सुनावलं 

उद्याची राज्यघटना कशी असेल यावर चे चर्चा करत नाहीत. पण जे सूचक विधाने समोर येत आहेत, त्यावरून हिटलरशारीस पुरस्कृत करणारी घटना असेल. आम्ही सांगू तसे करा. आम्ही सांगतो तेच करा. तोच उद्याच्या नवीन घटनेचा पाया असेल. ही रचना येतांना आपल्याला विरोध होऊ नये म्हणून अत्यंत सावध, पद्धतशीरपणे, जाणीवपूर्वक हिटलरशाहीस मानणार नाही, असं भासवल्या जातं.

1950 ते 2013 पर्यंत 7 हजार 200 कुटुंबांनी देश सोडला, मात्र 2014 ते 2024 पर्यंत देश सोडून जाणाऱ्या हिंदू कुटुंबांची संख्या 24 लाख झाली आहे. या 24 लाख कुटुंबांना, ज्यांची किमान मालमत्ता 50 कोटी रुपये आहे, त्यांना देश सोडण्यास भाग पाडले गेले. त्यांना मजबूर करण्यात आलं. हा देश सोडून गेलेला वर्ग संत परंपरेचा अनुयायी होता. परिस्थिती अशी तयार केली की, त्यांना देश सोडावा लागला. त्यांनीही त्यांच्या पुढील पिढीची चिंता म्हणून देश सोडला. त्यांना ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांसारख्या यंत्रणांची भीती घातली असा घणाघात आंबेडकरांनी केला.

भाजप इतरांची घरं फोडतेय
आगामी निवडणुकीसाठी चारशे पारची घोषणा भाजपने केली. त्याविषयी विचारले असता आंबेडकर म्हणाले की, भाजप दीडशेपारही जाणार नाही. भीतीपोटी ते असा अहंकार व्यक्त करत आहेत. पराभवाची चिन्हे दिसू लागल्याने ते स्वतःची समजूत काढत आहे. स्वतःची घरं शाबूत राहावं, म्हणून इतरांची घरं फोडत आहे, असा आरोप आंबेडकरांनी केला.

घराणेशाही चालेल पण गुन्हेगारीकरण नको
मनोज जरांगे यांच्या उपोषणाबाबत मी सरकारला काळजी घेण्याचा दिलेला सल्ला हा काही अनुचित घडू नये, या भावनेतून दिला आहे. एकवेळ घराणेशाही चालेल पण गुन्हेगारीकरण नको, या मताची मी आहे, असं आंबेडकर म्हणाले.

follow us