नेहरुंच्या नावे असलेल्या हैदराबादमधील बँकींग संस्थेचे नामांतर; काँग्रेसची भाजप-आरएसएसवर टिकेची झोड
भारतीय जनता पक्ष (Bharatiya Janata Party) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (Rashtriya Swayamsevak Sangha) पंडित जवाहरलाल नेहरूंबद्दल (Pandit Jawaharlal Nehru) तीव्र द्वेष आहे. नेहरू या नावाची अॅलर्जी असल्याने नेहरूंना सतत बदनाम केले जात आहे. त्याच विकृत मानसिकेमधून हैदराबाद येथील जवाहरलाल नेहरू इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स (Nehru Institute of Banking and Finance) या संस्थेचे नाव बदलून आयडीबीआय ट्रेनिंग कॉलेज असे ठेवण्यात आल्याची टीका काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी केली आहे. (Congress Criticized BJP And RSS for Name of banking institution in Hyderabad)
या संदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील पंडित जवाहरलाल नेहरू यांचे योगदान आणि देशाला स्वातंत्र्यानंतर जगात एक समृद्ध राष्ट्र बनवण्यात मोठा वाटा आहे. पंडित नेहरूंच्या आधुनिक विचारसरणीने भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देशद्रोही विचारसरणीला जोरदार चपराक दिली आहे. या दोन्ही संस्थांचे लक्ष्य नेहरू हेच आहे, त्यामुळे नेहरूंचे योगदान नाकारण्याचीसाठी त्यांना बदनाम करण्यची मोहिम भाजपकडून चालवली जाते आहे, असं लोंढे म्हणाले.
‘आषाढी वारी’निमित्त वारकऱ्यांना मिळणार टोलमुक्ती? बावनकुळेंचे गडकरींना पत्र
ते म्हणाले की, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कितीही प्रयत्न केले तरी या देशातील प्रत्येक भव्य दिव्य आणि देशाच्या विकासात मैलाचा दगड ठरलेल्या संस्था आजही दिमाखदारपणे उभ्या आहेत. एखाद्या संस्थेचे नेहरू हे नाव बदलून नेहरूंचे महत्त्व कमी होत नाही.
भाजप सरकारने कोणतेही उल्लेखनीय काम केलेले नाही. त्यांच्याकडे त्यांचे नाव घेण्यासाठी कोणीही महान व्यक्ती नाही, म्हणून ते पंडित नेहरूंसारख्या जगप्रसिद्ध नेत्याचे महत्त्व कमी करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. भाजप सरकार केवळ नाव बदलत आहे. अशा कोत्या मनोवृत्तीने नेहरूंचे नाव पुसले जाणार नाही, तर ते अधिक गडद होत जाईल, असं लोंढे म्हणाले.