भाजपचा मोठा निर्णय! जे.पी. नड्डांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढवला, ‘या’ महिन्यापर्यंत सांभाळणार धुरा
JP Nadda’s tenure as president extended : देशात लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections 2024) अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांसंदर्भात दिल्लीतील प्रगती मैदानाच्या भारत मंडपममध्ये भाजपचे (BJP) दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन सुरू झाले. आज या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भाजपने काही मोठे निर्णय घेतले. भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजपचे ज्येष्ठ नेते जेपी नड्डा (JP Nadda) यांना जून 2024 पर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव आणण्यात आला होता. ज्याला मंजुरीही मिळाली आहे.
मनोज जरांगेंना संपवण्याचा सरकारचा प्रयत्न; आंबेडकरांच्या आरोपाने एकच खळबळ
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता जे. पी. नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ जून 2024 पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे भाजप आता लोकसभा निवडणूक जेय पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखालीच लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले. त्यानंतर जे. पी. नड्डा यांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती.
‘आर्टिकल 370’ मध्ये अमित शाहांची भूमिका साकारतोय ‘हा’ मराठमोळा अभिनेता, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
भाजपचे 400 पार करण्याचे लक्ष्य
अबकी बार 400 पार या घोषणेनंतर आता पक्ष भाजप अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणूक लढवणार आहे.दरम्यान, भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात जेपी नड्डा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेलेले दशक यशाने भरलेले आहे याचा आम्हाला आनंद आहे. आज भाजप हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष बनला आहे. 2014 पूर्वी केवळ 5 राज्यात आमची सरकारे होती आणि बराच काळ आम्ही 5-6 मध्ये अडकलो होतो. मात्र, 2014 नंतर आज 17 राज्यात एनडीएची सरकारे आहेत आणि 12 राज्यात भाजपची सरकारे आहेत.
तीस वर्षांनी देशात बहुमताचे सरकार
2014 पूर्वी लोक आमची खिल्ली उडवायचे. मात्र, तीस वर्षांनंतर म्हणजे, 2014 मध्ये देशात पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन झाले. आज आम्ही अभिमानाने सांगतो की आमच्या पक्षश्रेष्ठींच्या परिश्रमाने आमच्या अधिवेशनाचे ‘महाअधिवेशनात’ रूपांतर झालेय भाजप हा एकमेव पक्ष आहे, ज्याचा वैचारिक पाया स्थिर आहे. मोदी सरकारच्या काळात अनेक कायदे आणले. त्यात महिला आरक्षण विधेयक’ 3 दशके राजकीय कारणांमुळे मंजूर होऊ शकले नाही, तेही आम्ही मोदी यांच्या नेतृत्वाखाली अवघ्या 3 दिवसांत मंजूर केले.