डबल इंजिन सरकार म्हणजे बेरोजगारांना डबल फटका; राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

  • Written By: Published:
डबल इंजिन सरकार म्हणजे बेरोजगारांना डबल फटका; राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

Rahul Gandhi : देशातील वाढत्या बेरोजगारीच्या (Unemployment) मुद्द्यावरून कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांध (Rahul Gandhi) सातत्याने सत्ताधारी भाजपला लक्ष्य करत आहेत. आता ते भारत जोडो न्याय यात्रेच्या (Bharat Jodo Nyaya Yatra) माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहे. त्यांची ही यात्रा सध्या उत्तर प्रदेशात आहेत. दरम्यान, त्यांनी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट लिहित बेरोजगारीच्या मुद्द्यावरून दिल्लीतील मोदी सरकार आणि यूपीतील योगींच्या भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. ‘डबल इंजिन सरकार म्हणजे बेरोजगारांना डबल फटका, अशी टीका त्यांनी केली.

400 पार करण्यासाठी मोदीचं कार्यकर्त्यांना १०० दिवसांच टार्गेट, ‘नव्या मतदारांना…’ 

राहुलने गांधींनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे ट्विट केलं. त्यांनी लिहिलं की, आज उत्तर प्रदेशातील प्रत्येक तिसरा तरुण बेरोजगारी नावाच्या आजाराने त्रस्त आहे. दीड लाखांपेक्षा जास्त सरकारी पदे रिक्त आहेत. या किमान शैक्षणिक पात्रता असलेल्या पदांसाठी पदवीधर, पदव्युत्तर आणि पीएचडीधारक उमेदवार नोकरी मिळण्यासाठी रांगेत उभे आहेत. पहिलं म्हणजे भरती निघणं हे स्वप्नचं असतं, असं राहुल गांधी म्हणाले.

पुढं त्यांनी लिहिलं की, भरती निघाली तर पेपर फुटतो, पेपर दिला तर निकाल कळत नाही. आणि प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर निकाल लागतो. अनेकदा रुजू होण्यासाठी न्यायालयाच जावं लागतं. लष्करापासून रेल्वेपर्यंत आणि शिक्षणापासून पोलिसांपर्यंत भरतीसाठी वर्षानुवर्षे वाट पाहिल्यानंतर लाखो विद्यार्थी ओव्हरएज झाले आहेत, असं राहुल गांधी म्हणाले.

430 धावांवर टीम इंडियाचा डाव घोषित, जैस्वाल-सर्फराजची वादळी खेळी; इंग्लंडला 557 धावांचे लक्ष्य 

निराशेच्या या चक्रव्यूहात अडकलेला विद्यार्थी नैराश्याचा बळी ठरत आहे आणि खचून जात आहे. या सगळ्यामुळं व्यथित होऊन जेव्हा तो आपल्या मागण्या घेऊन रस्त्यावर उतरतो तेव्हा त्याला पोलिसांचा लाठीमार करण्यात येतो. विद्यार्थ्यांसाठी नोकरी हे केवळ उत्पन्नाचे साधन नसून त्याच्या कुटुंबाचे जीवन बदलण्याचं स्वप्न आहे आणि हे स्वप्न भंगल्यानं संपूर्ण कुटुंब निराश होतं, असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.

दरम्यान, काँग्रेसची धोरणे तरुणांच्या स्वप्नांना न्याय देतील, त्यांची तपश्चर्या आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही, असा विश्वास राहुल गांधींनी व्यक्त केला.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube