Pruthviraj Chavan News : काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये उडी घेतली. त्यानंतर अशोक चव्हाण यांच्यासोबत विदर्भातील काही आजी माजी आमदारही भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना चांगलाच ऊत आला. मात्र, काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Pruthviraj Chavan) यांनी चर्चेला फुलस्टॉप देऊन टाकला आहे. अशोक चव्हाणांसोबत आमदारही भाजपात जाणार असल्याच्या फक्त वावड्या उठल्या असल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. त्यामुळे आता अशोक चव्हाण यांच्यासोबत कोणीही भाजपमध्ये जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
उद्धव ठाकरेंना लोक हास्यजत्रा म्हणून एन्जॉय करतील; बावनकुळेंचे टीकास्त्र
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. चव्हाण यांना शुभेच्छा आणि लखलाभ आहे. अशोक चव्हाण यांच्याबरोबर कोण जातं अशा फक्त वावड्या उठल्या असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच महाविकास आघाडी चर्चा सुरू असून महाविकास आघाडीमध्ये अशोक चव्हाण हे महत्त्वाचे घटक होते.
Udhhav Thackeray काय रे बाबा, जागेवर आहेस ना? ठाकरेंकडून तनपुरेंना मिश्किल टोला
आघाडीची चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झाली असून अंतिम चर्चा झाली की राज्यसभेसाठी चौथा उमेदवार कोण असेल हे तुम्हाला कळेल, पण चौथा उमेदवार कोण असेल? दिला जाईल का नाही? माहिती नाही, असं स्पष्ट शब्दांत चव्हाण यांनी सांगितलं आहे. राज्यसभेसाठी काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या चंद्रकांत हंडोरे यांचा अर्ज आम्ही भरणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळख असलेले अशोक चव्हाण यांनी आज आपल्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. अशोक चव्हाण यांच्या या राजीनाम्याच्या बातमीनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. अशोक चव्हाण यांनी आपला राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या BJP चर्चा रंगू लागल्या होत्या. अखेर अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. भाजपात प्रवेश करताच त्यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.