Download App

अपहरणाची तक्रार का घेतली? बँकॉकला निघालेलं विमान परत कसं आणलं? आयुक्तांनी सांगितली Inside Story

  • Written By: Last Updated:

Police Commissioner On Tanaji Sawants son kidnapping : तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचा मुलगा ऋषिराज सावंत आणि त्यांच्या दोन मित्रांसह बॅंकॉककडे रवाना झाले होते. त्यांना पुण्याकडे सुखरूप परत आणण्यात आलेलं आहे. यात पुणे (Pune) पोलिसांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. यावर आता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची (Police Commissioner Amitesh Kumar) प्रतिक्रिया समोर आलीय. अपहरणाची तक्रार का घेतली? बँकॉकला निघालेलं विमान परत कसं आणलं? याची इनसाईड स्टोरी पोलीस आयुक्तांनी सांगितली आहे.

घटनेवर बोलताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटलंय की, आमच्याकडे कंट्रोल रूमला एक फोन आला होता. कॉलमध्ये तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झाल्याची बातमी होती. पोलीस अपहरणाच्या घटनेवर पोलीस तातडीने कारवाई करतात. एफआयआर मिळाल्याप्रमाणे तातडीने आम्ही कारवाई सुरू केलीय. प्राथमिक तपासात ऋषिराज सावंत कुठे गेला, हे निष्पन्न झालं नव्हतं. नंतर समजलं ते एका खाजगी विमानाने ते पुणे विमानतळावरून रवाना झालेत. त्यानंतर तातडीने आम्ही फ्लाईट डिटेल्स काढले. त्यानंतर डीजीपीएला मेल केला. त्या अनुषंगाने त्या दिशेने कारवाई त्यांनी केली.

जरांगेला फिरायला वाळू माफियांच्या गाड्या, तो सगळ्या माफियांचा आका…; नवनाथ वाघमारेंचे टीकास्त्र

जेव्हा आम्ही मेल केला तेव्हा ते विमान इंडियन एअरस्पेसमध्येच होतं. तेव्हा त्यांच्याशी संवाद साधून ते विमान परत आणलं गेलं. तपासात काही अपहरण झालेलं नव्हतं, हे दिसून आलं. सुरूवातीच्या काळात हे प्रकरण संवेदनशील असल्याने पावले उचलले. सध्या तपास सुरू आहे, या प्रकरणात आणखी काही अॅंगल आहेत का? हे शोधलं जातंय. विमान नक्की कोठे होते? हे सांगणं आम्हाला अधिकृत नाहीये, असं पोलीस आयुक्त म्हणाले.

आम्ही सर्व अॅंगलने त्यावर तपास करत आहोत, बिझनेस मिटिंग वैगेरे असल्याचं काही निदर्शनास आलेलं नाही. ही अपहरणाची तक्रार होती. त्यावेळी फिर्यादी आणि त्यांचं कुटूंब प्रचंड घाबरलेलं होतं. त्यामुळे त्यादृष्टीने कारवाई करणे गरजेचे होते. काही अपवादा‍त्मक घटना घडण्याची शक्यता नाकारण्यात येत नव्हती, त्यामुळे पोलिसांनी तात्काळ दखल घेतली.

ट्रम्प यांचे व्याही प्रेम… दोन्ही मुलींच्या सासऱ्यांना दिली खास जबबादारी

स्वत: ते सुरूवातीला ते आम्हाला बोलले तेव्हा तानाजी सावंत खूप घाबरलेले होते. एका वडिलांच्या दृष्टिकोनातून विचार करावा लागेल. अपहरण झालं असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ पाऊल उचलावं, हे स्वाभाविक आहे. अपहरण हा खूप संवेदनशील विषय असतो. आम्ही पूर्ण ताकदीने प्रयत्न करण्यात करतो, या प्रकरणात देखील तेच झालंय. तक्रार मागे अजून मागे घेण्यात आली नसल्याचं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलंय.

 

follow us