Download App

ठाकरेंचं माझ्यावरील प्रेम जग जाहीर; नियुक्तीच्या टीकेवर नार्वेकरांचं शेलक्या शब्दांत उत्तर

Rahul Narvekar On Udhav Thackeray : उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांचं माझ्यावरील प्रेम हे जग जाहीर असून ठाकरेंनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी आभार मानत असल्याचं म्हणत शेलक्या शब्दांत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची पक्षांतर बंदी कायदा पुर्नविचार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलीयं. या नियुक्तीनंतर उद्धव ठाकरेंनी सडकून टीका केली. टीकेनंतर नार्वेकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

लोकसभेपूर्वीच राज्यसभेचे धुमशान : महाराष्ट्रासह 15 राज्यांतील 56 जागांसाठी निवडणूक जाहीर

नार्वेकर म्हणाले, उद्धव ठाकरेंचं माझ्यावरील प्रेम जग जाहीर आहे. त्यांनी मला नियुक्तीबद्दल ज्या शुभेच्छा दिल्या आहेत, त्याबद्दल मी आभार मानतो. आपल्या राज्यातील सहकाऱ्याला जबाबदारी मिळाल्यानंतर राज्यासाठी हा गौरवशाली क्षण आहे. पण विश्वास दाखवण्याऐवजी असं वक्तव्ये करणे म्हणजे त्यांना आपल्या राज्यातील व्यक्तीबद्दल त्यांना अस्मिता नसल्याचंही नार्वेकर म्हणाले आहेत.

सुदानमध्ये भीषण गोळीबार, 52 जणांचा जागीच मृत्यू, तर 64 हून अधिक गंभीर जखमी

अपात्र आमदार प्रकरणी निकाल दिल्यानंतर आता राहुल नार्वेकरांची पक्षांतर बंदी कायदा पुर्नविचार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलीयं. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही घोषणा केली असून मागील समितीन काही प्रमाणात काम केलं आहे आता नार्वेकर पुढे करणार असल्याचं बिर्ला यांनी स्पष्ट केलं आहे. या नियुक्तीवरुन विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.

Nitish Kumar : आता आम्ही कायमस्वरुपी.. CM बनल्यानंतर नितीश कुमारांची पहिली प्रतिक्रिया

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
हे लोकशाही संपवण्याचं पुढचं पाऊल मानायचं का? राज्यात नूकताच परिशिष्ट दहाच्या चिंधड्या उडवून जो उफराटा निर्णय नार्वेकरांनी दिलायं, त्याचं वस्त्रहरण आम्ही जनतेच्या न्यायालयात केलं पण त्याविरोधात आम्ही सर्वेोच्च न्यायालयातही गेलो. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना ही नेमणूक म्हणजे सर्वोच्च न्यायालयावर दडपण आणण्याचा प्रयत्न समजावा लागेल. आम्ही सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे असं म्हणणारे कोणीही असले तरीही त्यांना बाबासाहेबांच्या संविधानाची ताकद दाखवावी लागेल अन्यथा देशात बेबंदशाही येईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

निकाल दिल्याने सरकारकडून नार्वेकरांना बक्षीस..
ज्या व्यक्तीने आत्तापर्यंत 10 पक्षांतर करुन पचवली ठेकर दिलीयं, सर्वोच्च न्यायालयाने नेमल्यानंतर शिवसेनेच्या फुटीला त्यांनी मान्यता दिलीयं. अशा व्यक्तीला सरकारने बक्षीस दिलंय. बाबासाहेबांनंतर हेच घटनाकार त्यांना सापडले का? ओम बिर्ला बाबासाहेबांच्या घटनेचा अपमान करीत असल्याचं खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.

follow us