लोकसभेपूर्वीच राज्यसभेचे धुमशान : महाराष्ट्रासह 15 राज्यांतील 56 जागांसाठी निवडणूक जाहीर
नवी दिल्ली : मार्च महिन्यात लोकसभा (Lok Sabha) निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभा (Rajya Sabha) निवडणुकांची घोषणा केली आहे. महाराष्ट्रासह 15 राज्यांतील 56 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपत आहे. या जागांसाठी निवडणुकांची घोषणा झाली असून येत्या 27 फेब्रुवारीला या जागांसाठी मतदान होणार आहे. (Election Commission of india has announced Rajya Sabha elections for 56 seats in 15 states including Maharashtra.)
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, 15 राज्यांतील 56 जागांसाठी आठ फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी, तर 16 फेब्रुवारीला या अर्जांची छाननी होणार आहे. 20 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर 27 फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार असून त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता मतमोजणी होणार आहे.
‘सगेसोयरे’ अधिसुचनेनंतर भुजबळांचा पहिला शड्डू नगरमधून : राम शिंदे अन् पडळकरांचीही मिळणार साथ!
कोणत्या राज्यांतील किती जागा?
15 राज्यांतील 56 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यात उत्तर प्रदेशमध्ये 10, महाराष्ट्र, बिहार प्रत्येकी सहा, पश्चिम बंगाल-मध्य प्रदेश प्रत्येकी पाच, गुजरात, कर्नाटक प्रत्येकी चार, राजस्थान-ओडिशा-तेलंगणा-आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी तीन जागांसाठी निवडणुका होणार आहेत. याशिवाय छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये प्रत्येकी एक जागेसाठी मतदान होणार आहे.
सोशल मीडियावर गप्पा ठोकण्यापेक्षा सरकारकडे म्हणणे मांडा : विचारवंत, अभ्यासकांना जरांगेंची विनंती
महाराष्ट्रातील सहा जागांसाठी निवडणूक :
महाराष्ट्रातून 2018 साली राज्यसभेवर निवडून गेलेल्या सहा खासदारांची मुदत दोन एप्रिल रोजी संपत आहे. यात नारायण राणे, प्रकाश जावडेकर आणि व्ही मुरलीधरन या भाजपच्या तीन, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या वंदना चव्हाण, काँग्रेसचे कुमार केतकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे अनिल देसाई यांचा समावेश आहे. यापैकी तीन जागांवर नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawade) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) राज्यसभेवर जाणार असल्याच्या चर्चा आहेत.