‘सगेसोयरे’ अधिसुचनेनंतर भुजबळांचा पहिला शड्डू नगरमधून : राम शिंदे अन् पडळकरांचीही मिळणार साथ!

  • Written By: Published:
‘सगेसोयरे’ अधिसुचनेनंतर भुजबळांचा पहिला शड्डू नगरमधून : राम शिंदे अन् पडळकरांचीही मिळणार साथ!

अहमदनगर – आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी जालन्यातून मुंबईच्या वाशीपर्यंत पदयात्रा काढली. मुंबईच्या वाशीपर्यंत आल्यानंतर शिंदे सरकारने मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने अधिसूचना काढली असून याच अधिसूचनेला मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आक्षेप घेतला आहे. दरम्यान याबाबत ओबीसी नेत्यांची बैठक भुजबळ यांच्या निवासस्थानी पार पडली असून बैठकीअंतर्गत 3 फेब्रुवारी रोजी नगरमध्ये ओबीसींचा महामेळावा (OBC melawa) घेण्याचे ठरले आहे. या मेळाव्यानंतर राज्यव्यापी महाराष्ट्र यात्रा काढायची असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. दरम्यान एकप्रकारे मंत्री छगन भुजबळ हे ओबीसी संघर्षाचे रणशिंगच नगरमधून फुंकणार आहे.

मास्टरस्ट्रोक! 2025 मध्ये फायरब्रँड ‘सम्राट’ होणार नेक्ट CM?; नितीश कुमार यांना घरी बसवत काढणार पगडी 

मराठा कुणबी नोंदी असलेल्यांच्या सग्यासोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत राज्य सरकारकडून नुकताच अधिसूचनेचा मुसदा प्रसिद्ध करण्यात आला आहे. दरम्यान यानंतर ओबीसींचे आरक्षण धोक्यात येईल की काय अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आता मंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेतला आहे. भुजबळ यांचा नगरमध्ये 3 फेब्रुवारीला पहिला एल्गार मेळावा होणार आहे. हा एल्गार मेळावा यशस्वी होण्यासाठी नगरमधील ओबीसी समाजातील पदाधिकाऱ्यांनी तालुकानिहाय बैठकांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. ओबीसी समाजाचे आरक्षण वाचवण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्यामागे ठामपणे उभे राहण्याचे आवाहन या बैठकांतून केले जात आहे.

ओबीसी नेत्यांमध्ये फूट : छगन भुजबळांच्या आवाहनाला बबनराव तायवडेंचा ‘खो’ 

भुजबळ नेमकं काय म्हणाले?
राज्य सरकारच्या वतीने काढण्यात आलेल्या अधिसूचनेवर हरकती नोंदवण्यासाठी 16 फेब्रुवारीच्या डेडलाईन देण्यात आली आहे. आपण मोठ्या प्रमाणावर हरकती नोंदवाव्यात. 3 फेब्रुवारी रोजी अहमदनगर येथे ओबीसींचा एल्गार मेळावा आयोजित केला असून मोठ्या संख्येने मेळाव्यासाठी हजर राहावं, असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी मंत्री भुजबळांनी राज्यभर एल्गार यात्रा काढणार असल्याची घोषणा केली.

मेळाव्याला हे नेते उपस्थित राहणार
मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर राज्यभर मराठा समाजाकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे ओबीसी नेत्यांनी आपल्या समाजावर अन्याय झाल्याचं म्हणत आक्रमक पवित्रा घेतला आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर ओबीसी नेते एकवटले आहे. दरम्यान नगरमध्ये पार पडणाऱ्या ओबीसीच्या मेळाव्यासाठी ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यासह महादेव जानकर, प्रकाश शेंडगे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार राम शिंदे हे देखील असणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube