‘राहुल नार्वेकर लबाडाला सांगा हिंमत असेल तर..,’; ठाकरेंचं खुलं आव्हान
Udhav Thackeray On Rahul Narvekar : राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) लबाडाला सांगा, हिंमत असेल तर इथं येऊन विचार शिवसेना कोणाची? असं खुलं आव्हान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिलं आहे. काही दिवसांपूर्वीच अपात्र आमदार प्रकरणाचा निकाल राहुल नार्वेकरांनी दिला आहे. या निकालावरुन उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये आयोजित जाहीर सभेतून नार्वेकरांना आव्हान दिलं आहे.
Budget 2024 : गरीबांना अच्छे दिन! कर संकलनातून मिळालेला पैसा ‘या’ योजनांवर होणार खर्च
उद्धव ठाकरे म्हणाले, “जा त्या नार्वेकराला सांगा लबाडाला सांगा हिंमत असेल तर इथं मध्ये येऊन बोल मी तुझ्यासोबत येतो…सांग शिवसेना कोणाची? बंद दाराआड निर्णय देतोस,.. आम्ही काही गोष्टी दिल्या नाहीत असं सांगत आहेस, पण आम्ही वेळोवेळी शिवसेनेबद्दलचे सर्वच पुरावे निवडणूक आयोगाकडे दिलेले आहेत. त्याचे पुरावे आम्ही जनता न्यायालयात दाखवलेले आहेत. 2013 साली पक्षाची जेव्हा घटनादुरुस्ती झाली तेव्हा हेच गृहस्थ बिल्ला घालून तिथं उभे होते, या शब्दांत उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांनाही सुनावलं आहे.
IND vs ENG : विराटच्या जागी कोण? ‘या’ दोन खेळाडूंमध्ये स्पर्धा; BCCI लवकरच करणार घोषणा
तसेच जे म्हणतात की उद्धव ठाकरे पक्षप्रमुख नाही तेच दाढी खाजवत माझ्या पाया पडले होते. पण जनतेचे आशिर्वाद हीच शिवसेनेची घटना असल्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत सांगितलं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यात काही कडवी पाने आहेत, मोदींचं राजकारण घाणेरडं आहे. ते देश आणि गुजरातमध्ये एक भींत उभी करतात हे आम्हाला मान्य नाही. शिवरायांनी सुरत लुटली तेव्हा गुजरातची होती म्हणून नव्हती लुटली ती इंग्रजांची वखार होती म्हणून लुटली होती. तुम्ही आमचा महाराष्ट्र लुटता आहात मिंध्या तुझ्यासमोर महाराष्ट्र ओरबाडला जातोयं अन् तू खुर्चीसाठी शेपूट हलवतोस हेच बाळासाहेबांचं हिंदुत्व का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना केला आहे.
दरम्यान, शिवसैनिकांच्या घरी ईडी, सीबीआय, इनकमटॅक्स धाडी टाकतात. धाडीमध्ये घरं आमचं अन् हे पाय ताणून बसतात. येऊ द्या सत्ता तुमच्या तंगड्या तुमच्या गळ्यात घालतो की नाही पाहा. तुमच्या बंदोबस्तात असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार जनतेच्या पैशातून दिला जात आहे. भाजपने आता भेकाड जनता पार्टी असं नाव ठेवा. भाजप ही भेकडांची पार्टी असल्याची टीकाही उद्धव ठाकरे यांनी केलीयं.