Ramdas Kadam : राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. त्यामुळे इच्छुकांची मतदारसंघात धावपळ सुरु झाली आहे. कोणता पक्ष कोणत्या मतदारसंघात उमेदवार देणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे. यातच यावेळी दापोली मतदारसंघातून (Dapoli Constituency) शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यासाठी निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे. याचा कारण म्हणजे यावेळी रामदास कदम यांचे पुतणे अनिकेत कदम (Aniket Kadam) यांनी राजकारणात सक्रिय होण्याचा निर्धार केला आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत दापोली मतदारसंघातून ठाकरे गटाचे संजय कदम यांना निवडून आणण्याचा निर्धार केला आहे.
यावेळी अनिकेत कदम म्हणाले की, गेल्या तीन वर्षात आमच्यावर इन्कम टॅक्स, ईडीची धाड पडली तसेच साई रिसॉर्ट म्हणून जे प्रकरण गाजलं ते सर्व कौटुंबिक वादातून झाले होते, आता आम्ही खूप सहन केलं आहे. यावेळी आम्ही जिल्हाध्यक्ष संजयकाका कदम यांना कसंही करून निवडून आणायचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मागणी तीन वर्ष आम्हाला खूप मानसिक सपोर्ट केला आणि आमच्यासाठी ठामपणे उभे राहिले. त्यामुळे आता आमचं कर्तव्य आहे त्यांना निवडून आणायचं. संजयकाका कदम यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून आमदार होते आणि ते आता शिवसेनेत आहेत. असं अनिकेत कदम म्हणाले.
तर शिंदे गटाचे नेते रामदार कदम यांच्यावर प्रतिक्रिया देत अनिकेत कदम म्हणाले की, ते माझे मोठे काका आहे, त्यांचा मला आदर आहे पण प्रत्येकाची विचार मांडायची भूमिका वेगळी असते. त्या हिशोबाने आम्ही काम करणार. असं यावेळी अनिकेत कदम म्हणाले.
Pankaj Deshmukh : मोठी बातमी! पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या बदलीला स्थगिती
मी एक व्यवसायिक माणूस आहे आणि मला चांगली माणसं आपल्या क्षेत्रात हवी असतात. मात्र आता या क्षेत्राचे राजकारण झालं आहे, प्रत्येकाची एक सुरुवात असते, जशी योगेशदादाची पण सुरुवात होती तशी आज माझी राजकारणात सुरुवात आहे. आमदार तालुक्याचा प्रमुख असतो त्या हिशोबाने तालुक्यात चांगली कामे झाली पाहिजे आणि आम्ही त्या दृष्टीने विचार करून असेही यावेळी ते म्हणाले.