Badnera Assembly Election Result 2024: राज्यात पुन्हा एकदा महायुतीचीच (Mahayuti) सत्ता येणार हे निश्चित झाले आहे. आता रवी राणा (Ravi Rana) यांच्या विजयाची बातमी समोर आली आहे. रवी राणा यांनी बडनेरा विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. रवी राणा यांना 1 लाख 26 हजार 49 एवढी मत मिळाली आहेत.
Jalna Election Results : जालन्यात अर्जुन खोतकरांची हवा, काँग्रेसच्या उमेदवाराला चारली धूळ
बडनेरामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सुनील खराटे विरुद्ध महायुती पुरस्कृत अपक्ष उमेदवार रवी राणा यांच्यात लढत झाली होती. रवि राणा हे या जागेवर मागील तीन वेळा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवून विजयी झाले. यंदाही रवी राणा यांना 1 लाख 26 हजार 49 एवढी मते मिळाली आहेत. रवी राणा यांचा 66, 397 मतांनी विजय झाला. या निवडणुकीत त्यांनी मोठ्या फरकाने आघाडी घेत प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला.
अंतिम फेरी
रवी राणा – 126496 (+ 66397 मतांनी आघाडी)
प्रिती बंड – 60 हजार 99 मते
सुनील खराटे – 6744
रमेश नागदिवे – 3415
तुषार भारतीय – 3242
नेवाशात शिंदे गटाचे उमेदवार विठ्ठलराव लंघे विजयी, ठाकरे गटाचे माजी मंत्री शंकरराव गडाख पराभूत
दरम्यान, रवी राणा यांच्या विजयानंतर नवनीत राणा यांनी जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी नवनीत राणा यांनी भन्नाट डान्सही केला.
2019 ला काय घडलं?
रवी राणा यांनी 2019 मध्ये अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यांचा मुकाबला शिवसेनेच्या प्रीती संजय राव बंड आणि व्हीबीएचे प्रमोद यशवंतराव इंगळे यांच्याशी होती. मात्र मुख्य लढत रवी राणा आणि प्रीती बंड यांच्यात झाली. प्रीती बंड यांना 74,919 तर रवी राणा यांना 90,460 मते मिळाली होती. रवी राणा यांनी प्रीती बंड यांचा 15 हजार मतांनी मोठ्या फरकाने पराभव केला होता.